आधार कार्ड वेरिफाय कसं करायचं? क्यूआर कोड वेरिफिकेशन म्हणजे काय? वाचा सविस्तर
बँक ते सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड आवश्यक असते. यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का नाही हे पाहणं आवश्यक आहे. (Aadhar Card Verification)
नवी दिल्ली: आधार कार्ड आता आवश्यक कागदपत्र बनलं आहे. सर्व ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. बँक ते सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड आवश्यक असते. यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का नाही हे पाहणं आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करावे लागते याची माहिती आपण घेणार आहोत. (Aadhar Card Latest update how to verify aadhar card and qr code check here all details through M Aadhar App)
UIDAI ने m-aadhar चं अपडेटेड वर्जन लॉन्च केलं आहे. या अॅप्लिकेशनला आता अपडेट करण्यात आलं आहे. पहिल्यांदा येणाऱ्या अडचणी आता येणार नाहीत. याशिवाय M-Aadhar APP मध्ये काही आणखी फीचर सुरु करण्यात आली आहेत. याचा नागरिकांना फायदा होणार आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड वेरिफाय करु शकता. याशिवाय क्यूआर कोड बाबतही माहिती घेऊ शकता.
आधार कार्ड वेरिफाय कसं करायचं?
M-Aadhar अॅपद्वारे आधार कार्ड वेरिफाय करता येईल. अॅपमध्ये आधार वेरिफायचा ऑप्शन असतो. त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कराड् अॅक्टिव्ह आहे की नाही हे समजतं. याशिवाय मोबाईल फोन, मेल आयडी, बँक अकाऊंट आदी गोष्टी वेरिफाय करु शकता. याशिवाय आधारकार्डला कोणतं बँक अकाऊंट लिंक आहे हे देखील पाहू शकता. तुम्ही कोणत्याही सबसिडीचा फायदा घेत असाल तर तो देखील पाहू शकता. अनुदानाचे पैसे कोणत्या खात्यात पोहोचतं आहेत हे देखील आपल्याला माहिती होते, या अॅपद्वारे आपल्याला केवायीसी अपडेट करता येते.
क्यू आर कोड वेरिफाय कसा करणार?
तुम्ही तुमच्या आधारकार्डवर क्यूआर कोड पाहिला असेल, तो देखील वेरिफाय करणं आवश्यक असतं. आधार कार्डच्या M-Aadhar अॅप ओपन करा तिथे क्यू आर कोड स्कॅनर ऑप्शन असेल. यानंतर तुम्ही तुमच्या आधारकार्डवरील क्यू आर कोड स्कॅन करा. हे केल्यानंतर तुमच्या आधारकार्डची माहिती मोबाईलवर दिसली तर आधार कार्डमध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र, जर तुमच्या आधार कार्डवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर काही अडचण आली तर, तुम्हाला आधारकार्ड मध्ये दुरुस्ती करण्यची आवश्यकता आहे. काही ठिकाणी आधार कार्ड स्कॅन करण्याची गरज असते. मात्र, तिथे तुमचं आधार कार्ड स्कॅन झालं नाही तर अडचणी वाढू शकतात.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |https://t.co/TVtzuQrxkC#NewsAlert | #News | #NewsUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
संबंधित बातम्या:
Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!
10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर
(Aadhar Card Latest update how to verify aadhar card and qr code check here all details through M Aadhar App)