आधारकार्ड पॅनकार्ड अजून लिंक नाही केलं? तिसऱ्यांदा मुदत वाढवलीये, लगेच करून घ्या!

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता 31 मार्च 2022 रोजीपर्यंत आधार कार्ड पॅनकार्ड लिंक करता येईल. यापूर्वी  ही मुदत वाढविण्यात आली होती. यंदा 31 मार्च रोजी ही मुदत संपत आहे. त्यानंतर ही तुम्ही आधारकार्ड पॅनकार्डशी जोडले नाही तर तुमचे पॅन कार्ड अवैध ठरू शकते आणि ते रद्द होऊ शकते.

आधारकार्ड पॅनकार्ड अजून लिंक नाही केलं? तिसऱ्यांदा मुदत वाढवलीये, लगेच करून घ्या!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 4:45 PM

अवघ्या तीन महिन्यानंतर आधारकार्ड (Aadharcard) आणि पॅनकार्ड (Pancard) जोडण्याची (Linking) मुदत (deadline) संपत आहे. यापूर्वीही नागरिकांना  आधारकार्ड पॅनकार्डशी जोडणीचा मुदत देण्यात आली होती. कोरोना(COVID-19) आणि ओमायक्रॉनमुळे (Omicron) लिंक करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. जर तुम्ही अद्यापही जोडणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अंगातील आळस झटका आणि आधार व पॅनकार्ड लवकर लिंक करा अन्यथा तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते तसेच तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड(penalty) ही बसू शकतो.

पॅनकार्ड अवैध ठरू शकते

पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांची जोडणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या दोन कार्डची जर आपण जोडणी केलेली नसेल तर ती त्वरित करून घ्या. 31 मार्च 2022 ही त्यासाठीची अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे. यापूर्वीच आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची जोडणी करून घ्या. त्यानंतर पॅन कार्ड अवैध (Invalid) घोषित होऊ शकते. त्यानंतर पॅनकार्डचा वापर केल्यास अवैध पॅन कार्ड दिल्याप्रकरणी तुम्हाला दंडही बसू शकतो. दंडाची ही रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

1 एप्रिलपासून आधारकार्ड -पॅनकार्ड जोडणी सशुल्क

31 मार्च 2022 रोजीपूर्वी पॅनकार्ड आधारकार्डशी जोडल्यास नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सध्या हे दोन्ही कार्ड एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. मात्र मुदत संपल्यानंतर ही सेवा निःशल्क राहणार नाही. त्यासाठी नागरिकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. आधारकार्ड- पॅनकार्ड जोडण्यासाठी ग्राहकांना 1 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 31 मार्च 2022 रोजी पूर्वी हे दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक करून घ्या.

बँकेत खाते उघडणे होईल अवघड

सध्या तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) अथवा म्युच्युअल फंडमध्ये (Mutual fund) गुंतवणूक करत असाल आणि तुम्ही आधारकार्ड -पॅनकार्डचे संलग्नित केलेले नसेल. तर 31 मार्च 2022 रोजीनंतर तुमचे संबंधित स्टॉक आणि म्युच्युअल फंड खाते अवैध घोषित होईल. तसेच नागरिकांना बँकेत नवीन खाते उघडायचे असेल तर ही प्रक्रिया आधारकार्ड पॅनकार्ड सोबत जोडणी न केल्यामुळे पूर्ण होणार नाही.

टीडीएस तीनपट जास्त कपात होणार

पॅनकार्ड आधारकार्ड ची लिंक न केल्यास त्याचा आणखी एक फटका तुम्हाला बसू शकतो. नोकरदार वर्गाने कार्ड संलग्नता करण्यात दिरंगाई केली तर तीन पट टीडीएस (TDS) कपात होईल. पीएफ खात्यातून पैसे काढताना हे दोन्ही कार्ड संलग्न नसतील तर नागरिकांना तीन पट जास्त टीडीएस द्यावा लागेल.

Sanjay Raut: अब्दुल सत्तारांची हळद अजून उतरायची आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या, संजय राऊतांचा टोला

Weather Forecast : विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.