खूशखबर! विमान प्रवास झाला स्वस्त; ‘या’ कंपन्यांनी तिकीट दरात केली मोठी कपात

प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यात अनेक कंपन्यांनी तिकिट स्वस्ताईचा फंडा अवलंबला आहे. याचा प्रवाशांना सध्यातरी चांगलाच फायदा होणार आहे.

खूशखबर! विमान प्रवास झाला स्वस्त; 'या' कंपन्यांनी तिकीट दरात केली मोठी कपात
विमान प्रवास झाला स्वस्तImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 2:00 AM

नवी दिल्ली : तुम्हाला विमानाने पहिला प्रवास करायचा असेल, देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विमानातून जायचे असेल तर तुमच्या हवाई प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ ठरेल. केंद्र सरकार (Central Government)ने विमान तिकिट (Air Ticket) दरावरील मर्यादा हटवल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले तिकिट स्वस्त (Cheaper) केले आहे. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यात अनेक कंपन्यांनी तिकिट स्वस्ताईचा फंडा अवलंबला आहे. याचा प्रवाशांना सध्यातरी चांगलाच फायदा होणार आहे.

कंपन्यांमध्ये लागलेल्या चढाओढीमध्ये देण्यात आलेल्या नव्या ऑफरनुसार, मुंबई ते अहमदाबाद फक्त 1,400 रुपयांमध्ये किंवा मुंबई ते बंगळुरू अवघ्या 2,000 रुपये किंवा त्याहूनही कमी किमतीत उड्डाण करू शकणार आहे. हे आता शक्य झाले आहे, कारण विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये किंमत युद्ध सुरू झाले आहे.

गो फर्स्टमधून मुंबई-अहमदाबादचा प्रवास अवघ्या 1399 रुपयांत

अलीकडच्या विमानभाड्यांवर बारकाईने नजर टाकल्यानंतर आपल्याला तिकीट दरात झालेली मोठी कपात लक्षात येत आहे. सध्या तुम्ही जर गो फर्स्टच्या विमानातून मुंबई ते अहमदाबादचा प्रवास करणार असाल, तर तुमच्या या प्रवासासाठी तिकिटाची किंमत अवघी 1,399 रुपये एवढीच आकारली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

याच मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी Akasa Air कंपनीचे विमान तिकिट 1,497 रुपये इतके आहे. इंडिगो ही देशांतर्गत सर्वात मोठी विमान कंपनी या मार्गावर 1,609 रुपये इतकी तिकिट ऑफर देत आहे.

मुंबई ते बंगळुरूचा विमान प्रवास 2,000 रुपयांमध्ये करा

मुंबई ते बंगळुरूचा विमान प्रवासही चांगलाच स्वस्त झाला आहे. या मार्गावर 2,000 ते 2,200 रुपयांच्या श्रेणीत तिकिट उपलब्ध करण्यात आले आहे. Akasa Air ही नवी विमान कंपनी या मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी 1,997 रुपयांचे तिकिट ऑफर करत आहे, तर इंडिगोचे तिकीट 2,208 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने 31 ऑगस्टपासून विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवली आहे. त्यानंतर भारतीय विमान कंपन्यांमध्ये किंमत युद्ध सुरु होईल, अशी अपेक्षा होती. तसेच चित्र सध्या देशांतर्गत विमान मार्गावर दिसत आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यांच्यातील स्पर्धेचा देशांतर्गत विमान प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक विमान कंपन्या प्रवाशांच्या मागणीनुसार सूट देऊ शकतात, असा अंदाज हवाई प्रवास क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (After the central government removed the cap on air ticket prices, many companies made the tickets cheaper)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.