साडेतीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या (Akshya Tritiya) मुहुर्तावर तुम्हाला सोने खरेदीची (Gold Buy) सुवर्ण संधी मिळत आहे, देशात दसरा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेला सोने खरेदीला शुभ मानण्यात येते. भारतीय संस्कृतीत या सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सोन्याची केलेली खरेदी ही धन वृद्धी करणारी मानण्यात येते. त्यामुळे वर्षातून निदान या सणाच्या काळात सोन्यात थोडी का असेना वाढ करण्याचा प्रयत्न भारतीय करतात. कोरोनाच्या काळात ऑनलाईन खरेदीला (Online Shopping) महत्व प्राप्त झाले आहे. गुगल पेच्या (Google Pay) साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध असते ाणि 24 कॅरेट इतके शुद्ध मिळते. काही प्रक्रिया पूर्ण करुन तुम्ही संधीचे सोन्यात रुपांतर करु शकता
डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. जशी खरेदी करु शकता तसेच ऑनलाईन पद्धतीनेच त्याची विक्री करता येते. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची खरेदी करतो. हे सोने सुरक्षित ठेवण्यात येते आणि त्याला विम्याचे संरक्षणही असते. डिजिटल सोन्यातील गुंतवणूकही 1 रुपयापासून सुरू करता येईल. डिजिटल सोने खरेदी केल्यावर, खरेदीदाराला वैयक्तिक सुरक्षा वॉलेट मिळते ज्याचा विमा देखील काढता येतो. विशेष बाब म्हणजे बाजारभावानुसार या डिजिटल सोन्याचे रोखीत अथवा ख-या सोन्यात कधीही परतावा मिळविता येतो.
गुगल पेच्या (Google Pay) साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध म्हजे 24 कॅरेट इतके शुद्ध असल्याचा दावा गुगल पे करते. हे सोने एमएमटीसी-पीएएममार्फत (https://www.mmtcpamp.com) खरेदी -विक्री करण्यात येते. ते या संस्थेकडे सुरक्षित ठेवण्यात येते. तसेच त्यावर योग्य परतावा पण मिळतो. तर चला जाणुन घेऊयात या सोन्याची खरेदी-विक्री कशी करतात ते…
-गुगल पे अॅप्लिकेशन उघडा
-नवीन मेेन्यूवर क्लिक करा
-सर्चमध्ये गोल्ड लॉकर असे टाईप करा, तो शब्द शोधा
-गोल्ड लॉकर हा पर्याय निवडा
-खरेदी करा हा पर्याय निवडा. या ठिकाणी सोन्याचा सध्याचा बाजारभाव करांसहित तुमच्या समोर दिसेल
खरेदी करताना ही किंमत 5 मिनिटांकरीता स्थिर राहते. या व्यासपीठावर सोन्याच्या किंमतीत सातत्याने दिवसभर चढउतार होत असतात. जेवढे तुम्ही सोने खरेदी कराल, त्याला भारतीय रुपयांत चिन्हांकित करता येते. त्यानंतर रक्कम अदा करण्यासाठी चलनाची निवड करुन पुढील प्रक्रिया पुर्ण करा. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटातच सोने तुमच्या लॉकरमध्ये जमा झालेले दिसेल. अशीच प्रक्रिया तुम्हाला सोन्याची विक्री करताना पूर्ण करावी लागेल.