औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी; 200 पदांसाठी भरती

Job Recruitment | औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती. यापूर्वी बँकेत 1250 कर्मचारी होते.

औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी; 200 पदांसाठी भरती
औरंगाबाद जिल्हा बँक
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 7:20 AM

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बँकेत लवकरच नव्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या बँकेत मनुष्यबळ कमी असल्याने 200 नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.

औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती. यापूर्वी बँकेत 1250 कर्मचारी होते. मात्र, आता बँकेत केवळ 750 कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने भरती करणे गरजेचे असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी दिली.

कोल इंडियामध्ये 588 पदांवर संधी

कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) पदासाठी पदभरती जाहीर केली आहे. कोल इंडियाच्या नोटिफिकेशनुसार एकूण 588 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडची अधिकृत वेबसाईट coalindia.in ला भेट द्यावी लागेल. भारत सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बी टेक आणि बीएससी अभियांत्रिकी सारखी अभियांत्रिकी पदवी घेतले उमेदवार अर्ज करु शकतात.

कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार, मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे. पात्र उमेदवार 9 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करु शकतात. अर्जाचं शुल्क देखील 9 सप्टेंबरपर्यंत जमा करता येईल. कोल इंडियाकडून परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट coalindia.in वरील सूचना वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Govt Job: पदवीधरांसाठी सरकारी नोकऱ्या, उच्च न्यायालयात पीएसाठी नोकरी, 1.14 लाखांपर्यंत पगार

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, प्रोजेक्ट इंजिनिअर, ट्रेनीच्या 511 पदांवर संधी, 25 ते 35 हजारांपर्यंत पगार

PDCC Recruitment 2021: पुणे जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांसाठी चांगली संधी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.