AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? मोबाईल कंपन्या ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक देण्याच्या तयारीत!

महागाईची झळ बसणा-या सर्वसामान्यांना टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा शॉक देण्याच्या तयारीत आहे. मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्याचे संकेत भारती एअरटेल कंपनीने दिले आहेत.

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? मोबाईल कंपन्या ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक देण्याच्या तयारीत!
आक्षेपार्ह मेसेजला अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 8:38 AM

देशातील टेलिकॉम कंपन्यांची भूक भागणार नसल्याचे स्पष्ट संकेत टेलिकॉम कंपन्यांनी (telecom Company) दिले आहेत. ग्राहकांकडून अवाच्या सवा वसुलीसाठी कंपन्यांनी येत्या दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. एका ग्राहकाकडून कमीत कमी 300 रुपये वसुलीचे उद्दिष्ट टेलिकॉम कंपन्यांनी ठेवले आहे. सध्या या योजनेवर भारती एअरटेल कंपनी काम करत आहे. सध्या या कंपन्यांची मनमानी सुरुच आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रचंड दरवाढ केल्यानंतर नफा कमविण्याच्या लालसेत या कंपन्या देशातील करोडो युजर्सना पुन्हा महागाईचा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ करणा-या कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे संकेत दिले आहे. सध्याचे दोन-चार महिने ही झळ बसणार नसली तरी याच वर्षात रिचार्ज करणे सर्वसामान्यांना अवघड होणार आहे. आता या दरवाढीचा फायदा कंपन्याना होतो की वापरकर्ते यातून आयडीयाची कल्पना लढवितात हे लवकरच स्पष्ट होईल. 2022 साली मोबाईल कॉल (Mobile Call) आणि सेवांच्या किंमतीही वाढण्याचे संकेत देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) दिले आहेत.

दरवाढीच्या या स्पर्धेत एअरटेल पुढे जाण्यास कचरणार नाही, असे कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-याने स्पष्ट केले. प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPQ) 200 रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअरटेलने सर्वप्रथम मोबाइल आणि इतर सेवांच्या किमती 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही आपापले कॉल दर आणि इतर सेवा महाग केल्या होत्या.

सध्या 4 महिने दिलासा

याच वर्षात टॅरिफ दर वाढण्याचे संकेत भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोपाल विठ्ठल यांनी दिले. मात्र तुर्तास चार महिने हा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नेटवर्क सक्षमता आणि वेग वाढीवर भर देऊन वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर याच वर्षात दरवाढ करण्यात येणार आहे. प्रतिस्पर्धी तोपर्यंत काय भूमिका घेणार याकडे एअरटेलचे लक्ष असेल. मात्र त्यांनी काही हालचाल केली नाही तरी भारती एअरटेल दरवाढ करण्यात मागचापुढचा विचार करणार नसल्याचे विठ्ठल यांनी स्पष्ट केले.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट

कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करताना विश्लेषकांच्या प्रश्नावर विठ्ठल यांनी ही माहिती दिली. भारती एअरटेलचा डिसेंबर तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा 2.8 टक्क्यांनी घटून 830 कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29.867 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.सध्या प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPQ) 200 रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे, त्यानंतर तो पुढील वर्षांत 300 रुपयांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे सीईओ विठ्ठल म्हणाले.

4जी ग्राहकांच्या संख्येत 18.1% वाढ

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एअरटेलच्या 4जी ग्राहकांची संख्या वर्षागणिक 18.1 टक्क्यांनी वाढून 19.5 कोटींवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ही संख्या 16.56 कोटी होती. एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटाचा वापर 16.37 गिगाबिट्स (जीबी) वरून 11.7 टक्क्यांनी वाढून 18.28 जीबी झाला आहे. कंपनी उपकरणांचे अपडेट, नेटवर्क आणि क्लाउड बिझनेसवर 300 मिलियन डॉलर (2,250 कोटी रुपये) खर्च करणार असल्याचे गोपाल विठ्ठल यांनी सांगितले.

संबंधित अपघात :

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, व्याजासह कर सवलत मिळवा; पैसाही सुरक्षित

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.