Balanced Advanced Fund: शेअर बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षणासोबतच दमदार परताव्याचा मित्र

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे. कधी बाजार 500 अंकांनी वधरतो, तर कधी पार धराशायी पडतो.होतो. अशा वातावरणात म्युच्युअल फंडाचा बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड चांगल्या प्रकारे काम करतो. बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षणासोबतच दमदार परतावा हा फंड मिळवून देतो.

Balanced Advanced Fund: शेअर बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षणासोबतच दमदार परताव्याचा मित्र
म्युच्युअल फंडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:45 AM

मुंबई :  शेअर बाजार (Share Market) हा धोरण, नियोजन आणि अभ्यासाचा परिपाक आहे. त्यावर अनेक बाह्य शक्तींचा परिणाम होत असतो. अगदी छोट्या बातमीने ही त्याला हादरा बसतो. मार्केट गडगडते. पडते आणि सावरते. हा सर्व दोलनामय स्थितीतील खेळ आहे. तरीही शेअर बाजार हा अनेकांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. काहींसाठी रोजचा खर्च सूटला म्हणजे मिळविले असा खेळ आहे तर काहींसाठी ही नोकरी, व्यवसाय आहे. शेअर बाजार एका रेषेत कधीच जात नाही. तो एकाच स्थिती आणि एकाच गतीत कधीच नसतो. त्यामुळे अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटच्या अशा वातावरणात गुंतवणूक (Investment) कशी करावी, जेणेकरून त्यांना चांगला नफा मिळू शकेल, याचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. यासाठी म्युच्युअल फंडांचा बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड (Balanced Advanced Fund) ही एक चांगली योजना आहे जी शेअर्सच्या किंमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण देते. ही योजना डेट आणि इक्विटी या दोन्हीमध्ये गुंतवणूक करते. बाजार जेव्हा वधरतो तेव्हा त्यातील गुंतवणूक कमी होते आणि डेट फंडात गुंतवणूक वाढते. त्याचप्रमाणे बाजारात पडझड झाल्यावर ही योजना इक्विटीमध्ये जास्त पैसे टाकते. म्हणजेच डेट आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यांच्यातील समतोल साधण्याचे काम करतो आणि चांगला परतावा देतो.

2020 मध्ये या योजनेत इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला तो एप्रिल 2020 मध्ये, यावेळी बाजार कोलमडून पडला होता, त्यावेळी या फंडने 83 टक्के गुंतवणूक केली. पण जसजसा बाजारात तेजी आली, तसतशी त्याची गुंतवणूक कमी होत गेली. 31 मार्च 2022 पर्यंत तो 66 टक्क्यांवर आला. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स उच्चांकी पातळीवर असताना त्याने गुंतवणूक 59 टक्क्यांपर्यंत कमी केली होती.

म्युच्युअल फंड योजना म्हणजे बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड

बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड ही म्युच्युअल फंडांची योजना आहे. मार्च 2022 पर्यंत त्याची अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 1.78 लाख कोटी रुपये होती. एयूएम म्हणजे गुंतवणूकदारांच्या योजनेत येणारी रक्कम. या काळात फंड उद्योगाचे एकूण एयूएम 37 लाख कोटी रुपयांहून अधिक होते. एकूण 23 फंड हाऊसेस बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड योजना राबवितात.. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाला अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन म्हणूनही ओळखले जाते.

2021 मध्ये 48305 कोटींची गुंतवणूक

2021 मध्ये या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांनी एकूण 48,305 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड असलेल्या फंड हाऊसेसमध्ये एचडीएफसी हा सर्वात मोठा फंड आहे, त्यांच्याकडे मार्च महिन्यापर्यंत 43 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकदारांकडून येणारी रक्कम अर्थात एयुएम होती. अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडात मूल्यांकन आणि वाढीसह व्याजदर विचारात घेतले जातात. हे दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करते.

गुंतवणुकीवर चांगला परतावा

एचडीएफसी बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाने एका वर्षात 27.23 टक्के आणि 3 वर्षांत 13.81 टक्के नफा दिला होता. एक वर्षाच्या कालावधीत कोटकने याच योजनेत 9.3 टक्के आणि तीन वर्षांत 11.4 टक्के, अॅक्सिस फंडाने 10.8 व 8.6 टक्के नफा दिला होता, तर आयडीएफसीच्या फंडाने याच कालावधीत 9.96 व 10.62 टक्के नफा दिला होता.

फंड मॅनेजरची मुख्य भूमिका

या योजनेत फंड व्यवस्थापकांची भूमिका महत्त्वाची असते. म्युच्युअल फंड उद्योगातील एचडीएफसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन हे गेल्या 28 वर्षांपासून एकाच योजनेचे व्यवस्थापन करणारे एकमेव मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडमध्ये मासिक एसआयपीचा परतावा चांगला राहिला आहे.

इतर बातम्या

अस्थमाचा त्रास होतोय…? मग आजच पुण्याच्या बीएसआयमध्ये जाऊन अस्थमावरील रामबाण औषध घ्या!

PMP Bus Day Pune : पुणेकरांच्या आवडत्या PMPचा आज बस डे, महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

Vishwa Deenadayalan : भारताचा युवा टेनिसपटू विश्वा दीनदयालनचा भीषण अपघातात मृत्यू, आणखी तीन खेळाडू जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.