Bank Holiday | दिवाळीत बँकाना ताळे, इतक्या दिवस कामकाज बंद

Bank Holiday | दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण. या काळात बँकांना सुट्या असतात. या तारखांना बँकांचे कामकाज बंद असेल. कर्मचाऱ्यांना सुट्या असल्याने या काळात बँकांचे कामकाज होणार नाही. विविध शहरात या सुट्यांमध्ये फरक असेल. मात्र या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद असतील.

Bank Holiday | दिवाळीत बँकाना ताळे, इतक्या दिवस कामकाज बंद
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 1:57 PM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिना हा कर्मचाऱ्यांसाठी सुगीचा ठरणार आहे. भारतीय सणातील सर्वात मोठा दिवाळी सण आता तोंडावर आला आहे. या काळात देशातील अनेक शहरात बँका बंद असतील. राज्यात पण या दिवशी बँका बंद असतील. या महिन्यात शनिवार-रविवारसह सणाच्या दिवशी बँक बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यात काही सुट्ट्या प्रदेशानुसार बदलतात. त्या भागात सुट्टी असली तरी महाराष्ट्रात त्यादिवशी बँका सुरु असतील. आता डिजिटल युग असल्याने पैशांचे अनेक व्यवहार मोबाईलवरुनच होतात.

या दिवशी बँका बंद

येत्या रविवारपासून दिवाळी सुरु होत आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त बँकेला सुट्टी असेल. हा सण पाच दिवसांचा आहे. धनत्रयोदशी आणि भाऊबीजला 15 तसेच इतर दिवशी पण सुट्टी असेल. यामध्ये 12, 13 आणि 14 अशा सलग तीन दिवस सुट्या असतील. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक शहरातील बँका बंद असतील.

हे सुद्धा वाचा

या दिवशी सुट्टी

  • 10 नोव्हेंबर : वांगला उत्सवामुळे मेघालय राज्यात बँक बंद
  • 11 नोव्हेंबर : महिन्यातील दुसरा शनिवार, सुट्टी
  • 12 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी, या दिवशी दिवाळी
  • 13 नोव्हेंबर : गोवर्धन पूजा, त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील बँका बंद
  • 14 नोव्हेंबर : बलि प्रतिपदा, गुजरात, कर्नाटक, सिक्कीम आणि महाराष्ट्रात बँका बंद
  • 15 नोव्हेंबर : भाऊबीजेनिमित्त सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी
  • 19 नोव्हेंबर : रविवारमुळे बँकेला ताळे
  • 20 नोव्हेंबर : छठ पूजा बिहारसह राजस्थानमध्ये बँकेला टाळे
  • 23 नोव्हेंबर : उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यात सुट्टी
  • 25 नोव्हेंबर : चौथा शनिवार
  • 26 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
  • 27 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमामुळे त्रिपूरा, मिझोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगाणा, राजस्थान, जम्मू अँड काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात सुट्टी
  • 30 नोव्हेंबर : कर्नाटकातील बँका बंद

ऑनलाईन बँकिंग दिमतीला

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.