Bank Holidays 2022: जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत या काळात राहतील बँका बंद, तुमची बँकेतील कामे सुट्यांपूर्वीच उरकून घ्या

नवीन वर्ष आलं ते सुट्टी घेऊनच. 2022 वर्ष उजाडलं ते  शनिवार आणि रविवार सोबतीला घेऊनच. त्यामुळे बँकेसंबंधीच्या कामाला सोमवारीच ख-या अर्थानेच सुरुवात होईल. तर यासंपूर्ण वर्षात बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी आहे, ते जाणून घेऊयात .

Bank Holidays 2022: जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत या काळात राहतील बँका बंद, तुमची बँकेतील कामे सुट्यांपूर्वीच उरकून घ्या
एप्रिल महिन्यात पंधरा दिवस बँकांना सुट्या
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:21 AM

मुंबई : सोमवार ते शुक्रवार या दरम्यान बँकेची महत्वाची कामे करण्यास आपण प्राधान्य देतो. यंदा नवे वर्ष सुट्यांशी गट्टी घेऊनच आले आहे. शनिवार आणि रविवारचा निवांतपणा घेऊन आलेल्या नवीन वर्षात बँकांना कोणत्या दिवशी आणि किती सुट्या आहेत ते पण बघून घ्या. नाहीतर कामकाज नसलेल्या दिवशी तुम्ही तुमचे काम काढून बँकेत जाल आणि बंद बँकेसमोरुन तुम्हाला परत फिरावे लागेल. 2022 मध्ये बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे ते बघुयात

आरबीआय जाहीर करते सुट्यांची यादी

दर महिन्याला बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल याची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाहिर करते. बँकांच्या सुट्ट्यांमध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाने घोषीत केलेल्या सुट्यांचा समावेश असतो. देशात तीन राष्ट्रीय सुट्ट्या दिल्या जातात. प्रजासत्ताक दिवस-26 जानेवारी, स्वतंत्रता दिवस-15 ऑगस्ट आणि महात्मा गांधी जयंतीचा – 2 ऑक्टोबर यांचा यामध्ये समावेश आहे.

या महिन्यातील एक आठवडा सुट्यांचा

केंद्र आणि राज्यांच्या सुट्यांसह प्रत्येक महिन्याचा दुसरा शनिवार (Second Saturday)

आणि चौथा शनिवार (Fourth Saturday) या दिवशी देशातील बँका बंद असतात. या दिवशी बँकाचे कामकाज पुर्णतः बंद असते. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात 8 जानेवारी रोजी दुसरा शनिवार आणि 22 जानेवारी रोजी चौथा शनिवार येत आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतील. तर हक्काची रविवारची सुट्टी आहेच. यादिवशी बँका बंद असतात. जानेवारी महिन्यात 5 रविवार येत आहेत आणि या दिवशी कामकाज बंद असेल. 2 जानेवारी, 9 जानेवारी, 16, 23 आणि 30 जानेवारी रोजी रविवार येत असल्यामुळे बँकांचे कामकाज होणार नाही. म्हणजे जानेवारी महिन्यांत मोजून शनिवारसह रविवार मिळून एक आठवडा बँका बंद असतील.

इतर सुट्यांची यादी

जानेवारीः

1 जानेवारीः नवीन वर्षाचा दिवस

14 जानेवारीः मकर संक्रांत/पोंगल

15 जानेवारीः उत्तरायण, मकर संक्रांती, माघ बिहू

26 जानेवारीः गणतंत्र दिवस

फेब्रुवारीः

5 फेब्रुवारीः वसंत पंचमी

मार्चः

1 मार्चः महाशिवारात्री

18 मार्चः होळी

एप्रिलः

10 एप्रिलः रामनवमी

13 एप्रिलः उगादी(तेलगू नवीन वर्ष)

14 एप्रिलः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बैसाखी, बीजू महोत्सव, बोहाग बिहू

15 एप्रिलः गुड फ्रायडे, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू

मेः

2 मेः रमजान ईद (ईद-उल-फितर)

3 मे ः भगवान परशुराम जयंती/ रमजान ईद/बसवा जयंती /अक्षय तृतीया

9 मेः रवींद्रनाथ टॅगोर जन्मदिवस

16 मेः बुद्ध पौर्णिमा

जूनः

2 जूनः महाराणा प्रताप जयंती

14 जूनः संत गुरु कबीर जयंती

15 जूनः गुरु हरगोविंदजी जन्मदिवस

जुलैः

10 जुलैः बकरी ईद

ऑगस्टः

9 ऑगस्टः मोहर्रम

12 ऑगस्टः रक्षा बंधन

15 ऑगस्टः स्वतंत्रता दिवस

16 ऑगस्टः पारशी नवे वर्ष

19 ऑगस्टः जन्माष्टमी

31 ऑगस्टः गणेश चतुर्थी

सप्टेंबरः

8 सप्टेंबरः तिरुवोना

ऑक्टोबरः

2 ऑक्टोबरः महात्मा गांधी जयंती

3 ऑक्टोबर ः महाअष्टमी

4 ऑक्टोबरः महा नवमी

5 ऑक्टोबरः विजया दशमी

9 ऑक्टोबरः ईद ए मिलाद

24 ऑक्टोबरः दिवाळी

नोव्हेंबर

8 नोव्हेंबरः गुुरु नानक जयंती

डिसेंबरः

25 डिसेंबरः ख्रिसमस नाताळ

इतर बातम्या :

आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट

आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Financial Sector | नव्या वर्षामध्ये कुठे होईल बक्कळ कमाई, कुठे टाळता येईल नुकसान; गुंतवणुकीला स्मार्टनेसची जोड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.