AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays: मे महिन्यात 4 दिवस बँका राहतील बंद; उरकून घ्या बँकेतील कामे

मे महिन्यात चार दिवस बँका बंद राहतील. यासोबतच बँकांच्या अधिकृत साप्ताहित सुट्यांचा हिसेब जुळवला तर एकूण 11 दिवस बँकांचे कामकाज होणार नाही. ईद आणि अक्षय तृतीयाच्या सुट्टीचा यामध्ये समावेश आहे.

Bank Holidays: मे महिन्यात 4 दिवस बँका राहतील बंद; उरकून घ्या बँकेतील कामे
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:53 AM

उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून ओळखला जाणा-या मे महिन्यात बँकेची कामे लवकर उरकली नाही तर तुमचा घामाटा निघणार आहे. कारण मे महिन्यात चार दिवस बँकांच्या कामकाजाला ब्रेक (Bank Holiday) लागणार आहे. सुट्या असल्यामुळे या काळात बँकांचे कामकाज (Bank Working) होणार नाही.त्यामुळे पाच दिवसांच्या आठवड्यात सुट्यांचे नियोजन लक्षात घेऊन तुम्हाला बँकेचे कामकाज उरकून घ्यावे लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) दरवर्षी त्यांच्या दिनदर्शिकेत सुट्या (Holiday Calendar) जाहीर करते. यामध्ये त्या-त्या राज्यानुसार, सुट्यांचे दिवस जाहीर करण्यात येतात. त्यादिवशी बँकांचे कामकाज ठप्प असते. यामध्ये राष्ट्रीय सुट्यांचा ही समावेश असतो. त्यादिवशी संपूर्ण भारतातील बँकांचे कामकाज बंद असते. राज्यात आणि स्थानिक पातळीवर मोठे सण, उत्सव यांच्यानुसार सुट्यांचे नियोजन असते.

बँकेच्या सुट्ट्या म्हणजे शटर डाऊन, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंक शाखेत त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाइन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. तसेच हे लक्षात ठेवा की काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

मे महिन्यातील सुट्या

2 मे सोमवारी, रमजान-ईदची सुट्टी

3 मे मंगळवारी, भगवान श्री परशुराम जयंती/रमजान/ईद/बसव जंयती/ अक्षय तृतीया बद्दल सुट्टी

9 मे सोमवारी, गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर यांचा जन्मदिवस

16 मे सोमवारी, बुद्ध पोर्णिमा

या चार दिवशी मे महिन्यांत बँकेचे कामकाज होणार नाही. या चार दिवसांव्यतिरिक्त शनिवार-रविवारी पण बँका बंद असतात. रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार, दर महिन्यात रविवारी तर सुट्टी असतेच. पण त्यासोबतच दुस-या आणि चौथ्या शनिवारी ही बँकांना बोनस सुट्टी असते. जर या सर्व सुटया एकत्रित केल्या तर मे महिन्यांत एकूण 11 सुट्या असतील. त्यामुळे या सुट्या लक्षात घेत बँकेतील महत्वाची कामे त्वरीत उरकून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

संबंधित बातम्या : 

Elon buy twitter : एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच क्वईन लॉंच, लगेच वाढली 7 हजार टक्क्यांनी किंमत, हा घोटाळा तर नाही ना?

Price Increase : महागाई थांबता थांबेना! साबणपासून चॉकलेटपर्यंत किंमती वाढणार! किंमती वाढण्यामागचं कारण काय? जाणून घ्या…

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.