सावधान! रेटिंग पाहून वस्तुची ऑनलाईन खरेदी करता? …तर होऊ शकते फसवणूक

तुम्ही जर प्रोडक्टची रेटिंग पाहून ते एखाद्या ऑनलाईन साईटवरून खरेदी करत असाल तर वेळीच सावध व्हा.  कारण अनेक प्रमुख मार्केटिंग साईटच्या प्लॅटफॉर्मवर रेटिंग वाढवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब होत आहे.

सावधान! रेटिंग पाहून वस्तुची ऑनलाईन खरेदी करता? ...तर होऊ शकते फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : तुम्ही जर प्रोडक्टची रेटिंग पाहून ते एखाद्या ऑनलाईन साईटवरून खरेदी करत असाल तर वेळीच सावध व्हा.  कारण अनेक प्रमुख मार्केटिंग साईटच्या प्लॅटफॉर्मवर रेटिंग वाढवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब होत आहे. आपन जेव्हा एखाद्या वस्तुची ऑनलाईन खरेदी करण्याचे ठरवतो, तेव्हा आपण सर्व प्रथम त्या प्रोडक्टचे रिव्ह्यू  आणि रेटिंग पाहातो. संबंधित प्रोडक्टचे रेटिंग चांगले असल्यास ती वस्तू आपण खरेदी करतो. मात्र या व्यवाहारामध्ये आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण अनेकदा अवैध मार्गाने देखील संबंधित वस्तुचे रेटिंग वाढवले जाऊ शकतात.

अ‍ॅमेझॉन, गुगलची चौकशी

अशाच एका प्रकरणात ब्रिटिश रेग्युलेटरकडून जगातील प्रमुख ऑनलाईन मार्केटिंग कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि गुगलची चौकशी सुरू आहे. ब्रिटिश रेग्युलेटर कॉम्पिटिशन अ‍ॅन्ड मार्केट अथॉरिटी (CMA) ने गेल्या  जूनमध्ये बनावट रेटिंग प्रकरणात  अ‍ॅमेझॉन आणि गुगलची चौकशी सुरू केली आहे. प्रोडक्टची विक्री वाढवण्यासाठी अवैध पद्धतीने रेटिंग वाढवण्यात आले होते. अवैध पद्धतीचा अवलंब झाल्याचे लक्षात आल्यानंतर देखील त्याला आळा घालण्यासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आले नाहीत, असा आरोप या दोन्ही कंपन्यांविरोधात करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या दोनही कंपन्यांची चौकशी सुरू आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन

याबाबत बोलताना सीएमएच्या सीईओंनी सांगितले की, अनेक प्रमुख कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रोडक्टचे रेटिंग अवैध मार्गाने वाढवण्यात येतात. वस्तुचे रेटिंग पाहून ग्राहक ती वस्तू खरेदी करतात. मात्र अनेकदा त्या वस्तुचा दर्जा आणि गुणवत्ता तेवढी चांगली असेतच असे नाही. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.  ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या देखील याविरोधात कडक धोरण अवलंबवताना दिसून येत नाहीत. तसेच या प्रकारची फसवणूक झाल्यास ती रोखण्यासाठी सध्या तरी कुठलाही कायदेशीर मार्ग अस्थित्वात नाही. त्यामुळे ग्राहकांनी रेटिंग पाहून खरेदी करताना सावधानता बाळगावी, अन्यथा फसवणूक होऊ शकते.

संबंधित बातम्या 

क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, ‘असे’ आहेत नवीन दर

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

900 कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी काढले कंपनीतून, झुमवर सांगितले आज तुमचा शेवटचा दिवस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.