Jobs : या दिवाळीत आनंद दुप्पट, तरुणांची नोकरी पक्की, मोदी सरकारचे खास गिफ्ट!

Jobs : या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे..

Jobs : या दिवाळीत आनंद दुप्पट, तरुणांची नोकरी पक्की, मोदी सरकारचे खास गिफ्ट!
नोकऱ्यांचा पाऊस..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 4:29 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिवाळीच्या (Diwali) तोंडावर देशाभरातील तरुणांसाठी (Youth) मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. सध्या तरुणांसमोर रोजगाराचा (Employment) प्रश्न आ वासून आहे. त्यामुळे तरुणांसाठी लवकरच जॉब मेळा (Job Fair) घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळणार आहे.

22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 75,000 तरुणांना नोकरी प्रमाणपत्र (Job Certificate) वाटप करणार आहे. त्यामुळे तरुणांची दिवाळी गोड होणार आहे. सरकार या तरुणांना नोकरी देणार आहे.

एवढंच नाही तर, 10 लाख तरुणांना नोकरी देण्यासाठी पंतप्रधान रोजगार मेळा (Rojgar Mela) सुरु करणार आहेत. या मेळ्यात देशातील विविध मंत्रालय, विभाग आणि संघटनामधील अधिकारी उपस्थित असतील.

हे सुद्धा वाचा

या विभागातील रिक्त जागांसाठी योग्य आणि गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. योग्य शैक्षणिक आर्हता असणाऱ्या तरुणांचा यामध्ये समावेश असेल. नोकरीची संधी हुडकणाऱ्या तरुणांसाठी ही जोरदार संधी असणार आहे.

तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी झाडून सर्व विभाग दिमतीला लागले आहे. तरुणांना थेट रोजगार देण्यासाठी केंद्र सरकराचे हे मोठे पाऊल मानण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या निर्देशानंतर सर्व मंत्रालय आणि विभाग युद्धस्तरावर रिक्त जागांसाठी कामाला लागले आहेत.

रिक्त जागा भरण्यासाठी त्याची यादी तयार करण्यात आली आहे. विभागवार यादी तयार करण्यात येत आहे. या रोजगार मेळ्यात देशातील 38 मंत्रालयांमधील ग्रुप A, B आणि C मधील पद भरती करतील.

22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या रोजगार मेळ्याचे उद्धघाटन होणार ाहे. यामध्ये केंद्रीय आर्म्ड फोर्स पर्सनल म्हणजेच CAFP मध्ये इन्स्पेक्टर, कॉ़न्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनो, पीए, प्राप्तिकर अधिकारी आणि मल्टी टास्क स्टाफची भरती होईल.

यासोबतच संरक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, रोजगार मंत्रालय, टपाल खाते, CBI, बँकिंग आणि इतर सुरक्षा विभाग यामध्ये तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.