इनकम टॅक्स भरण्याआधी टॅक्स रेजिम म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं महत्त्वाचंय!
इन कम टॅक्स बद्दलची केली जाणारी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ही अर्थसंकल्पात काही प्रमाणत का होईना सवलत मिळावी अशी प्रत्येकाची आशा अपेक्षा असते. चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या टॅक्स सिस्टम मध्ये व गेल्यावर्षीच्या टॅक्स स्लॅब मध्ये नेमका काय बदल झाला आहे त्याबद्दल...
गेल्या अनेक दिवसांपासून या अर्थसंकल्पाची (Budget 2022) वाट सर्वजण पाहत होते,तो अर्थसंकल्प आज भारताचे अर्थमंत्री (Finance Minister Nirmala Sitaraman ) निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची आशा अपेक्षा सुद्धा होत्या आणि म्हणूनच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रत्येक जण या वर्षी आपल्याला गेल्यावर्षीपेक्षा काय नवीन मिळालेले आहे, याची तुलना करून लागलेला आहे. आज इन्कम टॅक्स सिस्टम बद्दलचे वेगवेगळे टॅक्स स्लॅब रेट ठरवण्यात आलेले आहे आणि त्याच बरोबर प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्न वर्गानुसार त्याचे मूल्य व रेट सुद्धा ठरवण्यात आलेले आहे, चला तर मग जाणून घेऊया या वर्षी आपल्याला काय नवीन मिळाले आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि आताच्या तुलनेत नेमका काय फरक आहे त्याबद्दल जाणून घेऊया.. नवीन टॅक्स सिस्टम (New tax system) नुसार , टॅक्स धारकांना काही प्रमाणात दिलासा देणारा तसेच टॅक्स स्लॅब हा पर्यायी ठरणार आहे म्हणजेच की जर तुम्हाला टॅक्स भरताना जुनी पद्धत किंवा नव्या पद्धतीने सुद्धा टॅक्स भरता येणार आहे.जर तुम्ही आधीच्या पद्धतीने टॅक्स भरणार असाल तर अश्या वेळी लागणार टॅक्स आणि मिळणारी टॅक्स मधील सवलत सवलत सुद्धा तुम्हाला आधीच्या म्हणजेच जुन्या पद्धतीचे नियम लागू होतील.
गेल्या आणि यंदाच्या वर्षी टॅक्स स्लॅब मध्ये फारशी सुधारणा न करता तसेच टॅक्स रेट ठेवण्यात आले आहे. ज्या व्यक्तींचे वार्षिक इनकम 2.5 लाख रुपयांपर्यंतचे आहे ते करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर जुन्या तसेच नवीन कर प्रणाली अंतर्गत 5 टक्के रेटने टॅक्स आकारला जाईल
5 लाख ते रु. 7.5 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावर जुन्या टॅक्स 20% रेटने कर आकारला जायचा परंतु आता नवीन नियमानुसार, टॅक्स रेट 10% करण्यात आला आहे.
7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत ज्या व्यक्तीचे उत्पन्न आहे त्या व्यक्तीला जुन्या टॅक्स सिस्टम नुसार 20 टक्के रेट टॅक्स आकारला जायचा पण आता नवीन टॅक्स सिस्टम नुसार हा रेट 15 टक्के असेल.
ज्या व्यक्तींचे पर्सनल इनकम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होते त्यांना जुन्या टॅक्स नियमानुसार, 30 टक्के रेटने टॅक्स आकारण्यात येत होता त्याचबरोबर नवीन नियमानुसार, 10 लाख रुपयांच्या वर इनकम असलेल्या व्यक्तीसाठी तीन स्लॅब ठरवले गेले आहेत. 10 लाख ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावर नवीन नियमानुसार 20 टक्के रेटने टॅक्स आकारला जाईल. 12.5 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जाईल.
सेस आणि सब चार्जमुळे प्रभावी इनकम रेट खूपच जास्त आहे. 5 लाखांपर्यंत निव्वळ करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कलम 87A अंतर्गत जुन्या आणि नवीन दोन्ही टॅक्स सिस्टममध्ये 12,500 रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळू शकते. त्यामुळे नव्या कररचनेनुसार 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न कमावणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. 5 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल.
संबंधित बातम्या :
Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!
Budget 2022: 80 लाख घरे बांधणार, लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटी; वाचा बजेटमधील 25 मोठ्या घोषणा
Budget 2022| महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार, 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार- अर्थमंत्री