Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crorepati Stock | बुलेट च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना लॉटरी, 1000 रुपयांचे केले 5 लाख

Crorepati Stock | रॉयल एनफील्डची मूळ कंपनी Eicher Motors चा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला. ब्रोकर्संनी या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

Crorepati Stock | बुलेट च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना लॉटरी, 1000 रुपयांचे केले 5 लाख
शेअरचा 'रॉयल' परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 4:29 PM

Crorepati Stock | बाईकर्सची फायर ब्रँड बुलेटच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. रॉयल एनफील्डची (Royal Enfield) ची मूळ कंपनी आयशर मोटर्स (Eicher Motors) च्या शेअरने कमाल केली. मंगळवारी वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे 3582 अंकावर हा शेअर पोहचला. या वर्षात या शेअरमध्ये 30 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.

मल्टीबॅगर शेअर

हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी लॉटरी ठरला आहे. गेल्या 20 वर्षांतील परतावा पाहिल्यास, गुंतवणूकदारांना 500 पट्टीने परतावा मिळाला आहे.

आणखी तेजी दिसेल

ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीज नुसार हा शेअर अजून तेजीने पुढे जाईल. या ब्रोकरेज हाऊसने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

4900% परतावा

आयशर मोटर्सने गेल्या 20 वर्षांत जवळपास 500 पट्टीत, 4900 टक्के परतावा दिला आहे.

7 रुपयांहून 3500 रुपये

20 वर्षांपूर्वी या शेअरचा भाव 7 रुपये होता. आता या शेअरचा भाव 3500 रुपये झाला आहे.

एक हजारांचे झाले 5 लाख

या शेअरमध्ये 1000 रुपये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

एक कोटींचा परतावा

आयशर मोटर्समध्ये 20 हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना या शेअरने मालामाल केले आहे. त्यांची गुंतवणूक वाढून ती आता 1 कोटी रुपये झाली आहे.

फायरिंग जोरात

रॉयल एनफील्डने दुचाकी बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. सरत्या ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या बुलेट विक्रीत 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांचे नवीन मॉडेल हंटर 350 ने बाजारात कहर केला असून तरुणांच्या या गाडीवर उड्या पडल्या आहेत.

विक्रीत नवीन रेकॉर्ड

भारतीय बाजारात रॉयल एनफील्डच्या व्यवसायात ऑगस्ट महिन्यात 45 टक्के वाढ झाली. देशात एकूढण 62,236 बुलेट ऑगस्ट महिन्यात विक्री झाल्या. तर 7,876 बुलेटची निर्यात करण्यात आली.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.