Business Idea | अवघ्या 4 लाखात सुरू करा ‘हा’ उद्योग, बना लखपती!

स्वत:चा बिझनेस सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय निवडावा याविषयी अनेकांना प्रश्न पडलेला असतो. अवघ्या चार लाखात सुरू करता येणारे काही बिझनेस मॉडेल पुढे आले आहेत. कपाळावर लावण्यात येणारी बिंदी अर्थात टिकली निर्मिती उद्योग सध्या जोरात सुरू आहे. भारत सरकारच्या मुद्रा योजनेतंर्गत अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी पतपुरवठा करण्यात येता. बिंदी उद्योगाला देखील यातून पतपुरवठा होत आहे.

Business Idea | अवघ्या 4 लाखात सुरू करा 'हा' उद्योग, बना लखपती!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 3:12 PM

आजकालच्या धकाधकीच्या जीवन आणि कोरोनाच्या (Covid-19) अनिश्चितेच्या वातावरणात  स्वत:चा उद्योग (Start-Up) सुरू करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. यामुळे नोकरी (Job) पेक्षा उद्योगातून (Business) अधिक पैसा (Income) कमावण्याची संधी अनेक जण शोधत आहेत. आता उद्योग उभारणीचा शोध थांबणार आहे. कारण अगदी कमी खर्चात उद्योग उभाण्याची माहिती यातून देण्यात येणार आहे. अवघे चार लाख रुपये (4 Lakh) खर्च करून मोठा नफा कमावण्याची किमया या उद्योगातून साधता येणार आहे.

Photo – Google

देशात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अर्धी आहे. महिला या कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात. पण नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना कुंकू लावणे शक्य होत नाही. यामुळे महिला या बिंदी अर्थात टिकली लावतात. याच अत्यंत छोट्या दिसणाऱ्या या प्रोडक्टमधून (Small Product) मोठा उद्योग उभारण्याची क्षमता आहे. सध्याच्या काळात बिंदी ही नुसती पारंपरा जपणारी गोष्ट नसून याची सांगड आता फॅशनशी देखील घालण्यात येत आहे.

प्रत्येक घरात टिकलीची अनेक पाकिटे पडलेली दिसून येतात. या उत्पादनाची मागणी कधीही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस या उत्पादनाची मागणी वाढतच चालली आहे. वेगवेगळ्या आकार, रंग व प्रकारच्या बिंदी अर्थात टिकल्यांची सध्या फॅशन (Fashion) सुरू आहे. अमुक रंगाचा ड्रेस घातला की, त्यावर त्याच रंगाची टिकली लावण्याचा  ट्रेंड (Trend) सध्या आहे. यामुळे बिंदी निर्मिती उद्योगाची भरभराट होत आहे.

अगदी कमी खर्चाचा उद्योग

केंद्र सरकारचा खादी व ग्रामउद्योग कमीशन अर्थात केवीआईसीकडून बिंदी निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर पंतप्रधान मुद्रा लोन या योजनेतून देखील हा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकतं.खादी अॅंड विलेज इंडस्‍ट्रीज कमीशनच्या  रिपोर्ट नुसार, बिंदी उद्योग सुरू करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. उद्योगाची यंत्रे ठेवण्यासाठी अवघ्या 500×300 वर्ग फुट जागेची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे जागा नसेल तर ती तुम्ही भाड्याने देखील घेउ शकता.  हा उद्योग सुरू करण्यासाठी काही यंत्र समग्रीची आवश्यकता असते. यात बॉटल कॅप सिलिंग मशिन, बॉटल कैप सिलिंग मशीन, फिल्टरिंग यूनिट, स्टोरेज टॅंक यांचा समावेश असतो. यंत्र सामग्री खरेदीसाठी  1 लाख रुपये खर्च येतो. तसेच दीड लाखाच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते.

सहा लाखाच्या बिंदी उद्योगासाठी खर्च

1. रॉ मटेरियल : 2 लाख 60 हजार 500 रुपये 2. लेबल आणि पॅकिंगसाठी: 50 हजार रुपये 3. मजुरी : 1 लाख 50 हजार 4. पगार : 48 हजार 5. ऑफिस खर्च 15 हजार 6. ओव्हर हेडसवर : 14 हजार 500 रुपये 7. घसारा खर्च 17 हजार 500 रुपये 8. विमा खर्च 2 हजार 500 9. इतर 7 हजार 500 10. भांडवली कर्ज हप्ता 32 हजार 500 11. कर्जावरील व्याज वर्षाला 52 हजार रुपये

किती होईल महिन्याची कमाई

बिंदी निर्मिती उद्योगासाठी वर्षाला सहा लाख रुपये खर्च करावे लागतील. तसेच अंदाजे विक्रीची किंमत 7 लाख 50 हजार रुपये राहिल. यात 1 लाख 50 हजाराचे सरप्लस असेल. तसेच नेट सरप्लस 1 लाख 32 हजार रुपये आहे. म्हणजे दर महिन्याची कमाई 11 हजार रुपये होउ शकते. केवीआईसीच्या रिपोर्ट नुसार, ही आकडेवारी सांकेतीक आहे. यात काही बदलही होउ शकतात. जर इमारत बांधकामाचा खर्च न करता भाड्याच्या इमारतीत हा प्रकल्प सुरू केल्यास प्रोजेक्ट कॉस्टमध्ये घट होईल. तसेच भांडवली खर्च कमी होवून व्याज (Interest) देखील कमी होईल.

हेही वाचा

Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या…

Gold price | 24 कॅरेट सोने 48500 वर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!

जमीन खरेदीला वितुष्टांचे ग्रहण;  रजिस्ट्री रद्द होण्यासाठी ही परिस्थिती ठरु शकते कारणीभूत

Home Loan | कमाईवर नको गृहकर्जाचा भार, योग्य EMI निवडल्यास आर्थिक ओढाताण टळणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.