Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

PayTM Loan : छोटा-मोठा व्यापार करणाऱ्यासाठी पेटीएमनं गूडन्यूज दिली आहे. डिजीटल पेमेंट सर्विस ऍप असलेल्या पेटीएमनं छोट्या व्यावसायिकांना पाच लाखांचं कर्ज देण्याची योजना आणली आहे.

Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 12:24 PM

मुंबई : अडीअडचणीला पैसे कुठून उभे करायचे असा प्रश्न अनेकांना पडतोच. तेव्हा नेमकं पैसे कुणाकडे मागू? कोण देईल? कुणासमोर हातपास पसरु? अशी अवस्था होऊन जाते. पण आता कर्जासाठीची एक नवी योजना पेटीएम घेऊन आलं असून या योजनेची फारच चर्चा रंगली आहे. पाच लाख रुपयांपर्यंत विना गॅरंटी लोन पेटीएम (Pay TM) देतंय. नेमकी ही योजना काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. याच योजनेबद्दलची सगळी माहिती आता जाणून घेणार आहोत. अत्यंत कमी व्याजदरात पेटीएमनं विना हमी लोन (Loan Scheme without guaranty) देण्याची योजना समोर आणली आहे. अनेकांनी या योजनेचा लाभही घेतला असून ही योजना नेमकं काम कशी करते? ते समजून घेणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कर्ज घेण्याच्या योजनेत दरदिवशी थोड्या-थोड्या प्रमाणात ईएमआय (EMI) भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

कुणाला मिळू शकतं कर्ज?

छोटा-मोठा व्यापार करणाऱ्यासाठी पेटीएमनं गूडन्यूज दिली आहे. डिजीटल पेमेंट सर्विस ऍप असलेल्या पेटीएमनं छोट्या व्यावसायिकांना पाच लाखांचं कर्ज देण्याची योजना आणली आहे. या योजनेसाठी एनबीएफसीसोबत पेटीएमनं करार केलाय. या कर्जाच्या योजनेला कोलॅटरल फ्री इन्टंट लोन असंही म्हणतात. पेटीएम ऍपच्या माध्यमातून मर्चंट लिडिंग प्रोग्रामच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येईल.

हे लोन घेतलेल्यांना परफेड वेळेच्या आधी करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. तसंच पाच लाख रुपयांचं हे लोन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरीक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. लोन प्रीपेमेंटवर कोणताची चार्ज घेतला जात नाही.

पाच स्टेप्समध्ये पाच लाख!

1 पेटीएम फॉर बिझनेस ऍपमध्ये गेल्यावर बिझनेल लोन आयकॉनवर क्लिक करा. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची पडताळणी करा. गरजेप्रमाणे कर्जासाठी रक्कम कमी जास्त करुन घ्या.

2 एकदा का रक्कम निश्चित केली की त्यानंतर एकूण रक्कम, द्यायवयाची एकूण रक्कम, दरदिवशी भरावा लागणारा ईएमआय, कालावधी यांसारखे डिटेल्सही तातडीनं समोर येतील.

3 आपले सगळे डिटेल्स तपासून घ्या. चेक बॉक्सवर क्लिक करा आणि गेट स्टार्टेडवर टॅप करा. याननंतर आपले CKYC च्या माध्यमातून केव्हायसी डिटेल्स मिळवा आणि पुढच्या प्रकियेसाठी परवानगी द्या.

4 यानंतर एक नवी विंडो समोर येईल. त्यात आपलं पॅन काईड, जन्मतारीख, ईमेल यासारखे डिटेल्स कन्फर्म करा. यानंतर पुन्हा एकदा ऑफर कन्फर्मेशनसह पुढे जाता येईल. यानंतर पॅन कार्ड वेरीफाय झाल्यावर आपला क्रेडीत स्कोअर किती आहे, हे पाहून केव्हायसी वेरीफाय केले जातील.

5 यानंतर कर्जासाठीचा आपला अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या अकाऊंटवर कर्जाची रक्कम वितरीत केली जाईल. पण त्याआधी अर्ज सबमिशन आधी एकदा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

अनेकांसाठी फायदेशीर?

सरासरी काळाप्रमाणे कर्जाची रक्क वाढवता येऊ शकते, असाही एक दावा केला जातो. 12 ते 14 महिन्याच्या टेन्युअरसोबत 1,20,000 पासून 1,40,000 पर्यंत लोन मिळू शकतं, अस लाईव्ह मिंटच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आतापर्यंत 25 टक्के व्यापाऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळा अशाप्रकरं पेटीएममधून कर्ज घेतलेलंय.

संबंधित बातम्या :

IPO आधी LICला मोठा फटका! कोरोनामुळे पॉलिसीच्या विक्रीत मोठी घट, गेल्या 3 वर्षात किती नुकसान?

GOLD PRICE TODAY: मुंबईत सोन्याच्या भावात घसरण; पुणे, नाशकात स्थिर; जाणून घ्या आजचे भाव

Fixed Deposit : SBI नंतर आता HDFCमध्येही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी खूशखबर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.