मेहनत आणि इमानदारीचे फळ; चेन्नईमधील आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कारची भेट
चेन्नईमधील एका आयटी कंपनीकडून सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना (employees) मोठे गिफ्ट (Gift) देण्यात आले आहे. या कंपनीकडून आपल्या तब्बल 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट (Car gift to employees) करण्यात आली आहे. या कंपनीचे नाव Ideas2IT असे आहे.
चेन्नईमधील एका आयटी कंपनीकडून सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना (employees) मोठे गिफ्ट (Gift) देण्यात आले आहे. या कंपनीकडून आपल्या तब्बल 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट (Car gift to employees) करण्यात आली आहे. या कंपनीचे नाव Ideas2IT असे आहे. या कंपनीमधील 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीची कार गिफ्ट करण्यात आली आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही कार गिफ्ट देण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची निवड केली आहे, जे कर्माचारी गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आमच्यासोबत काम करत आहेत. ज्यांचे कंपनीच्या विकासात आणि वाढीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. कंपनीच्या संकट काळात ज्यांनी कंपनीची साथ सोडली नाही. अशा एकूण शंभर कर्मचाऱ्यांना आम्ही कार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. कंपनीचे मार्केटिंग प्रमुख हरि सुब्रमण्यम म्हणाले की, आमचे आधीपासूनच एक सूत्र आहे, व्यवसायामधून जी संपत्ती निर्माण होते, त्या संपत्तीवर कंपनीसोबतच कर्मचाऱ्यांचा देखील हक्क आहे. त्यामुळेच आम्ही कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
…म्हणून घेतला निर्णय
आयडीयास टू आयटी कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन मुरली विवेकानंदन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आज कंपनीने जी काही मजल मालरली आहे, जे काही यश संपादन केले आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही शंभर अशा कर्मचाऱ्यांची निवड केली की जे गेल्या दहा वर्षांपासून आमच्या कंपनीसोबत आहेत, ज्यांनी संकट काळात कंपनीची साथ सोडली नाही. कंपनीच्या वाढीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. अशा कर्मचाऱ्यांना आम्ही आज कार गिफ्ट केली आहे. इतर कर्मचाऱ्यांना देखील यातून कामाची प्रेरणा मिळेल.
कंपनीसोबत काम करत असल्याचे समाधान
ज्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट मिळाली आहे, त्यातील एका कर्मचाऱ्यांने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, कंपनी आतापर्यंत नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत आली आहे. कंपनी नेहमीच आम्हाला महागडे गिफ्ट देत असते. एवढेच नाही तर कंपनी प्रत्येक सनाला देखील आम्हाला गिफ्ट देते. कंपनी कर्मचाऱ्यांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेते. आज कार मिळाली आहे. अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वन्प आज पूर्ण झाल्याची भावना आहे. कंपनीच्या अशा व्यवहारांमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते.
संबंधित बातम्या
आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश