AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन

Pan Aadhaar Linking | त्यानुसार आता PAN Card आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख मुदत मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत सहा महिन्यांनी वाढवल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
पॅनकार्ड आधार लिंकिंग
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 12:02 PM

मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन व्यवहार आणि इतर कामकाज करण्यात बऱ्याच समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅनकार्ड (Pancard) आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. तसेच ITR फाईल करण्यासाठीही अतिरिक्त अवधी देण्यात आला आहे. (link pan card to Aadhar card deadline extended till March 2022)

त्यानुसार आता PAN Card आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख मुदत मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत सहा महिन्यांनी वाढवल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का, हे कसे चेक कराल?

अनेकांना पॅनकार्ड आणि आधार लिंक झालं आहे की नाही याची कल्पना नसते. मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. यासाठी, आपल्याला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/AhaarPreloginStatus.html वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

तर दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर view link aadhaar status वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला Sucess असे दाखवले जाईल. मात्र जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडलेले नसेल तर तेही तुम्हाला दाखवले जाईल. यामुळे तुम्हाला आधार पॅनशी जोडलेले आहे की नाही हे सहज जाणून घेता येईल.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅन कार्डसह आधारला कसे लिंक कराल?

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN <SPACE>12 अंकी आधार क्रमांक> <SPACE> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

ऑनलाईन लिंक करण्याची प्रक्रिया

पॅनकार्डसह आधार लिंक करण्यासाठी अधिकृत आयकर वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा. ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. हे केल्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यात पॅन, आधार क्रमांक आणि आपले नाव भरा. जर आपल्या आधारवर फक्त जन्माचे वर्ष लिहिले गेले असेल तर आपणास हा पर्याय निवडावा लागेल – ‘आधार कार्डमध्ये माझ्याकडे फक्त जन्माचे वर्ष आहे’. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लिंक आधारावर क्लिक करा. हे केल्यावर प्रक्रिया पूर्ण झालेलं पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये पॅनशी संबंधित माहिती दिसेल.

हे काम ऑफलाईन करा

ऑफलाईन लिंकसाठी आपल्याला PAN सेवा प्रदाता, NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्रास भेट द्यावी लागेल. येथे ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत सोबत अन्य काही कागदपत्रेही कॉपी करावी लागतील. या वेळी आपल्याला निश्चित फी देखील द्यावी लागेल. या प्रक्रियेद्वारे आपण पॅनला आपल्या आधारशी लिंक करू शकता.

संबंधित बातम्या:

आयकर विभागाचे तीन मोठे निर्णय, करदात्यांवर काय परिणाम होणार?

PAN Aadhaar Linking: पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द, भरावा लागणार दंड

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....