सरकारच्या ‘या’ उपक्रमांतर्गत बेरोजगारांना कमाईची मोठी संधी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून (Government) विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यापैकी एक उपक्रम सध्या सुरू करण्यात आला आहे. ज्याचे नाव भारतीय जनऔषधी केंद्र (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Kendra) असे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकार तुम्हाला तुमच्या गावात, शहरात जनऔषधी केंद्र सुरू करून चांगल्या कमाईची संधी उपलब्ध करून देत आहे.

सरकारच्या 'या' उपक्रमांतर्गत बेरोजगारांना कमाईची मोठी संधी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 7:53 AM

नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून (Government) विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यापैकी एक उपक्रम सध्या सुरू करण्यात आला आहे. ज्याचे नाव भारतीय जनऔषधी केंद्र (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Kendra) असे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकार तुम्हाला तुमच्या गावात, शहरात जनऔषधी केंद्र सुरू करून चांगल्या कमाईची संधी उपलब्ध करून देत आहे. सध्या जनऔषधी केंद्र (Janaushadhi Kendra) सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील 406 जिल्हे आणि 3579 तालुक्यात जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मार्च 2024 पर्यंत जनऔधषी केंद्राची संख्या वाढवून दहा हजार करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. जनऔषधी केंद्रांची संख्या वाढल्यास नागरिकांना स्वस्तात औषधोपचार मिळतील, सोबतच या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

काय आहे जनऔषधी केंद्राची संकल्पना?

नागरिकांना विशेषता: जे गरिब नागरिक आहेत, ज्यांना महागडे औषधोपचार परवडू शकत नाहीत, अशा लोकांच्या मदतीसाठी जनऔषधी केंद्राच्या संकल्पनेचा उदय झाला. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून चांगल्या प्रतिची औषधे नागरिकांना स्वस्तात उपलब्ध करून दिली जातात. मार्च 2024 पर्यंत जनऔधषी केंद्राची संख्या वाढवून दहा हजार करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 31 मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार सध्या देशात जनऔषधी केंद्रांची संख्या 8610 इतकी आहे. येणाऱ्या काळात जनऔषधी केंद्राची संख्या वाढून त्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त औषधोपचार आणि रोजगार मिळून देण्याचे सरकारचे उदिष्ट आहे.

जनऔषधी केंद्रात कोणती औषधे मिळतात

1616 औषधांचा समावेश हा जनऔषधी केंद्रांतर्गत करण्यात आला आहे. याशिवाय याप्रकारच्या औषध केंद्रांमध्ये 250 सर्जिकल उपकरणाचा देखील समावेश होतो. यामध्ये विविध आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश आहे. याशिवाय काही आयुष उत्पादनांचा देखील समावेश जनऔधषी केंद्रामध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयुष किट, बलरक्षा किट आणि आयुषच्या विविध प्रकारच्या 64 टॅबलेटचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

कर्जात बुडालेल्या देशांना बाहेर काढण्याची गरज; आर्थिक संकटात सापडलेल्या देशांबद्दल भारताला चिंता – निर्मला सितारमण

Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ

Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.