चायना मांजा आला तरी कुठून, बंदी असताना तो बाजारात मिळतो कसा?
प्लॅस्टीक व नॉयलॉनच्या दौऱ्यापासून हा मांजा तयार होतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या घोळ तयार करुन त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. धातू व लोखंडाचा भुगाही टाकला जातो. अॅल्मिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापर केला जातो. हा मांजा धारधार शस्त्रप्रमाणे होतो.
मांज्यामुळे गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी, अनेकांचा मृत्यू मांज्यामुळे युवकाला विजेचा धक्का या प्रकारच्या घटना संक्रातीच्या जवळपास घडतात. चीनी मांज्यामुळे हे प्रकार होतात. बंदी असूनही चीनी मांजा विकला कसा जातो.
मकर संक्रांतीचा (makar sankarat)उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. धार्मिक महत्वाप्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा देखील मकर संक्रातीला आहे. सक्रांतीच्या आठवड्यापुर्वीच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग (kite)दिसतात. बर्याच ठिकाणी भव्य पतंगोत्सवाचे (kite festival)आयोजन केले जातो. अनेक ठिकाणी स्पर्धा देखील घेतल्या जातात. परंतु मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त उडवले जाणाऱ्या पतंगासोबत चायना मांजा वापरला जातो. यामुळे अनेक अपघात होतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. त्यामुळेच सरकारने त्यावर बंदी आणली आहे. त्यानंतरही चीनी मांजा चोरी-छुपे तयार केला जातो आणि विकला जातो. पाहूया हा मांजा बनतो कसा, त्यामुळे काय होते.
पतंग भारतात आली कशी : पतंगाचा जन्म खरा चीनमध्ये झाला. सुमारे तीन हजार वर्षांपुर्वी चीनमधील एका शेतकऱ्याने आपल्या टोपीला दोरा बांधून उडवल्याचे म्हटले जाते. तिच खरी पतंगाची सुरुवात होती. त्यानंतर कागदापासून पतंग करुन उडवले जाऊ लागले. चीनमधून पतंगाचा प्रवास भारतात झाला. चीन व कोरीयामधील प्रवाशी पतंग घेऊन भारतात आले. त्यानंतर पतंग भारतात आले आणि उडवले जाऊ लागले.
पतंगसाठी वापरला जाणारा दौरा : पतंगासाठी चीनमधून मांजा भारतात आला का? मग त्याला चीनी मांजा का म्हणतात? हे प्रश्न विचारले जातात. परंतु चीनी मांजा नाव असले तरी तो चीनमधून येत नाही. तो आपल्याच देशात बनवला जातो. त्यावर केंद्र सरकार व एनजीटी म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाने बंदी आणली आहे. त्यानंतरही त्यांची चोरी-छुपे निर्मिती देशात केली जाते अन् विक्री होते.
चीनी मांजा तयार कसा होतो : चीनी मांजासाठी सुतापासून तयार केलेला दोरा वापरला जात नाही. प्लॅस्टीक व नॉयलॉनच्या दौऱ्यापासून हा मांजा तयार होतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या घोळ तयार करुन त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. धातू व लोखंडाचा भुगाही टाकला जातो. अॅल्मिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापर केला जातो. हा मांजा धारधार शस्त्रप्रमाणे होतो. यामुळे पतंग उडवण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या प्रतिस्पर्धीची पतंग सहज कापली जाते. पतंग उडवणाऱ्याचा हातही कापला जातो. आकाशात उडणारे पक्षी यामुळे गंभीर जखमी होतात. त्यांचा मृत्यूही होतो. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारकांच्या गळ्यात हा मांजा अडकल्यास गंभीर दुखावत होते. त्यांच्या कान कापल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चीनी मांज्यात लोह, अमोनियम ऑक्साईड असल्यामुळे तो विजेचा सुवाहक होतो. यामुळे पतंग उडवताना मांजा विजेच्या तारांमध्ये अडकल्यास शॉटसर्कीट होतो. मांज्यातून विजेचा प्रवाह सुरु झाल्यामुळे पंतग उडवणाऱ्यास विजेचा धक्का बसतो. यामुळेच या मांज्यावर बंदी आणली गेली आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा जुन्या काळापासून आहे. श्रीरामांनी पतंग उडवल्याचा उल्लेख रामायणात आहे. त्यामुळे या उत्सवाला धार्मिक महत्व आहे. परंतु त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. मकर संक्रांत हिवाळ्यात येते. या काळात थंडी असते. पतंग उडवण्यामुळे आपल्या हात व पायांचा व्यायाम होतो. शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे आपणास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. हिवाळ्यातील आजार सर्दी खोकला यापासून बचाव होतो. धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व असणाऱ्या या सणाच्या उत्सावावर चीनी मांजा वापरुन विरजण का टाकावा.