AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Medical Insurance : आरोग्य विमा खरेदी करताना टाळा या पाच चुका, फायद्याचे गणित जुळवा

या महामारीच्या सत्रात कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे कवच आवश्यक आहे. मात्र आरोग्य विमा खरेदी करताना काही चूका टाळणे आवश्यक आहे. या चुका टाळल्या तर आरोग्य विमा स्वस्तात मिळेल आणि आपत्कालीनस्थिती तुम्हाला त्याचा फायदा ही होईल.

Medical Insurance : आरोग्य विमा खरेदी करताना टाळा या पाच चुका, फायद्याचे गणित जुळवा
Health-Insurance
| Updated on: Feb 09, 2022 | 10:12 AM
Share

मुंबई : कोरोना महामारीने वैद्यकीय विम्याचे (Health Insurance)महत्त्व अधोरेखित केले. रुग्णालयाची अवाच्या सव्वा बिलं बघून चांगल्या व्यक्तीची बोबडी वळते, तिथे जनसामान्यांची काय अवस्था असेल ? त्यामुळे सध्या प्रत्येकाचा ओढा आरोग्य विमा खरेदीकडे आहे. कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण आग्रही आहे. कोरोना काळात (Covid Period) वैद्यकीय खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे. Coverfox.com संचालक जॉन मायेन यांच्या मते, डिसेंबर 2019 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील महागाईचा दर 3.8 टक्के होता, जून 2021 मध्ये हा दर 7.7 टक्के झाला. म्हणजे दोन वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील खर्चाचे गणित दुप्पटीवर गेले.

कोरोनामुळे रुग्णालयात उपाचारासाठी प्रचंड खर्च लागला. त्यामुळे अनेकांनी स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी वैद्यकीय विमा खरेदी करण्याकडे मोर्चा वळविला. महामारीच्या काळात विमा कंपन्यांना मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली. मोठ्या प्रमाणात दाव्यांचा निपटारा करावा लागला आणि विम्याची मागणी वाढल्याने विम्याच्या हप्त्यात वाढ झाली आहे. अशावेळी स्वस्तात विमा खरेदी करण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा.

योग्य संरक्षण मिळवाः तुमच्या गरजेनुसार आरोग्य विम्याचे योग्य संरक्षण मिळवायला हवे. त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी तुमच्या गरजा, आर्थिक उत्पन्न आणि विम्याचा हप्ता याची सांगड घालावी लागेल. विमा पॉलिसीत रुग्णालयातील उपचारापूर्वी आणि नंतर किती खर्च मिळू शकतो, याची माहिती घ्या. योजनेत आरोग्य तपासणीची सोय आहे की नाही याची माहिती घ्या. प्रतिक्षा कालावधी किती आहे, कॅशलेस सुविधा आहे की नाही, यासंबंधीची इंत्यभूत माहिती मिळावा आणि नंतरच विमा खरेदी करा. विमा तज्ज्ञाच्या मते, वैद्यकीय विम्याचे संरक्षण हे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 50% असणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांचा तुमचा आरोग्यावर किती खर्च झाला याचाही सारासार विचार तुम्ही करावा.

वैद्यकीय माहिती लपवू नका: आरोग्य विमा खरेदी करताना सर्वात महत्वाचे पथ्य पाळायचे, ते म्हणजे तुमची वैद्यकीय माहिती लपवू नये. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना यापूर्वी कोणते आजारा होते. काही मोठे आजार आणि त्यावरील उपचार सुरु असतील तर त्याची माहिती, तसेच शस्त्रक्रिया यांची माहिती अगोदरच विमा कंपनीला द्या. ही माहिती लपवून तुम्ही आरोग्य विमा खरेदी केल्यास पुढे आकस्मिक खर्चाच्यावेळी तुमची विमा कंपनी हा खर्च देणार नाही.

रुम भाड्यासह इतर अनुषंगिक लाभ काय मिळतील ते समजून घ्या. वैद्यकीय विम्यासह रुम भाडे किती मिळेल, तसेच यासोबत अनुषंगिक लाभ किती मिळतील याची विचारणा करा. विम्यात किरकोळ वैद्यकीय खर्चासह कोण-कोणते खर्च मिळतील याची माहिती अगोदरच मिळवा. त्याची लिखीत हमी आहे का याचा पडताळा करा. नाहीतर उपचार घेताना या सर्व गोष्टींचा खर्च तुम्हाला करावा लागेल आणि त्याचा ताण तुमच्यावर येईल.

गुगलच्या मदतीने निवडा उत्तम उत्पादन : इंटरनेटच्या युगात संपूर्ण जगाची माहिती यूट्यूब आणि गुगलवर सहज उपलब्ध आहे. अशावेळी गुगलबाबावर जाऊन वैद्यकीय विमा खरेदी करून कंपनीच्या अटींविषयी सर्व काही जाणून घेता येईल. वैद्यकीय विम्यातील किचकट संज्ञेविषयी, शब्दाविषयी माहिती मिळत नसेल तर गुगलची मदत घ्या. तसेच योजनेची तुलना करा आणि योग्य तो आरोग्य विमा खरेदी करा.

लहान वयातच वैद्यकीय विमा खरेदी करा : वैद्यकीय विमा खरेदी करताना त्यात सर्व प्रकारच्या आजारांचा समावेश असावा. याशिवाय यात अपघात झाल्यास त्याच्या खर्चाचीही तरतूद त्यामध्ये असावी. अनेक कंपन्यांनी आरोग्य विम्याच्या विविध योजना बाजारात आणल्या आहेत. आजून एक वैशिष्ट्ये म्हणजे जर तुम्ही जास्त वयात वैद्यकीय विमा खरेदी केला तर प्रीमियमची रक्कम जास्त असेल. पण कमी वयातच वैद्यकीय विमा घेतल्यास, तुम्हाला हप्ता ही कमी येईल. तरुण असल्याने आरोग्य विमा कमी किंमतीत मिळेल. विलंब कालावधीचा फायदा घेता येईल. विम्याची रक्कम ही अधिक असेल.

संबंधित बातम्या :

‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार

Amazon ची ऑफर, फक्त 4 तास काम, दरमहिना कमवाल 60,000 रुपये

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.