Bank holidays : बँकांशी संबंधित कामे पटापट पूर्ण करा; एप्रिल महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुटी
एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holidays in April) त्यामुळे जर तुमचे एप्रिल महिन्यात काही महत्त्वाचे काम असेल तर आजच आपले काम पूर्ण करून घ्या. किंवा एप्रिल महिन्यात बँकेत अचानक कमा निघल्यास सुट्यांची यादी चेक करूनच आपल्या बँकेत जा.
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holidays in April) त्यामुळे जर तुमचे एप्रिल महिन्यात काही महत्त्वाचे काम असेल तर आजच आपले काम पूर्ण करून घ्या. किंवा एप्रिल महिन्यात बँकेत अचानक कमा निघल्यास सुट्यांची यादी चेक करूनच आपल्या बँकेत जा. कारण या महिन्यात देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. यादी चेक न करता तुम्ही बँकेत गेलात आणि जर बँकेला सुटी असेल तर तुमचा वेळ आणि पैसा दोनही खर्च होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला (FY 2022-23) देखील सुरुवात होत आहे. नव्या आर्थिक वर्षात आर्थिक क्षेत्राशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. जर तुम्ही तुमच्या पॅनला आधार कार्ड लिंक केले नसेल तर आजच लिंक करून घ्या. 31 मार्च ही पॅन आणि आधार लिंकिंगची डेडलाईन आहे. त्यानंतर तुम्हाला आर्थिक व्यवहारात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील बँकांना कोणत्या महिन्यात किती सुट्या आहे, याची एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीनुसार या महिन्यात देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत.
‘असे’ असते सुट्यांचे नियोजन
मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक असते. आरबीआयकडून देशभरातील बँकांच्या सुट्याची यादी महिन्यांच्या आधारावर वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध केली जाते. मात्र या यादीत अशा देखील काही सुट्या असतात. ज्या सुट्या फक्त त्या-त्या प्रदेशासाठीच मर्यादीत असतात. उदा: आठवड्याचा दुसरा आणि चौथ्या शनिवार आणि प्रत्येक रविवार या सुट्या देशातील प्रत्येक बँकेला असतात. परंतु अशा देखील काही सुट्या असतात की ज्या सुट्या त्या -त्या प्रदेशातील प्रसिद्ध व्यक्तीच्या जंयती पुण्यतिथीनिमित्त किंवा एखाद्या प्रसिद्ध उत्सावाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जातात. अशा सुट्या या संपूर्ण देशात लागून होत नाहीत तर त्या प्रदेशापुरत्या मर्यादीत असतात.
एप्रिल महिन्यात 15 दिवस बँक बंद
- एक एप्रिल – एक एप्रिलला वार्षिक क्लोजिंग दिवस म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी देशाभरातील जवळपास सर्वच बँका बंद राहतात
- दोन एप्रिल – दोन एप्रिलला शनिवार आहे. यंदाचा गुढीपाडवा दोन एप्रिल शनिवारी असल्यामुळे दोन एप्रिल रोजी बँका बंद राहातील
- तीन एप्रिल – तीन एप्रिलला रविवार असल्यामुळे रविवारी देशभरातील बँकांना साप्ताहिक सुटी असते, त्यामुळे बँका बंद राहातील
- चार एप्रिल – चार एप्रिल सोमवारी सरहुलसाठी रांची आणि झारखंडमधील बँकांना सुटी आहे.
- पाच एप्रिल – पाच एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम यांची जंयती आहे. बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त तेलंगना आणि हैदराबादमधील बँकाना सुटी आहे.
- नऊ एप्रिल – नऊ एप्रिल रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
- दहा एप्रिल – दहा एप्रिल रोजी रविवार आहे, रविवारी देशभरातील बँकांना आठवडी सुटी असते, त्यमुळे बँका बंद राहातील
- चौदा एप्रिल – चौदा एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे बँकांना सुटी राहणार आहे.
- पंधरा एप्रिल – पंधरा एप्रिल रोजी गुड फ्राइडे, बंगाली नववर्ष आणि हिमाचल दिवस असल्यामुळे बँकांना सुटी असणार आहे,
- सतरा एप्रिल – सतरा एप्रिल रोजी रविवार आहे. रविवारी बँकांना आठवडी सुटी असते त्यामुळे बँका बंद राहातील
- एकवीस एप्रिल – एकवीस एप्रिल रोजी गडिया पूजा नावाचा एक मोठ्या उत्सव अगरताळा आणि आसपासच्या प्रदेशात असतो त्यामुळे त्या दिवशी तिथे बँका बंद राहणार आहेत
- तेवीस एप्रिल – तेवीस एप्रिल रोजी आठवड्याचा चौथा शनिवार 24 एप्रिल रोजी रविवार आणि 29 एप्रिलला शब ई कद्र, जुमात उल विदाच्या निमित्ताने बँक बंद राहणार आहेत.