सराफा दुकानावर उसळली गर्दी, या प्लॅटफॉर्मवर मिनिटांत मिळवा सोने
Dhanteras Gold | धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त गाठण्यासाठी आज सोने खरेदीची योजना असेल तर सराफा बाजारात तुफान गर्दी असेल. गर्दी टाळून सोने खरेदी करायचे असेल तर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. त्यासाठी तुम्हाला धक्के सहन करण्याची गरज नाही. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन किंमती आणि वजनानुसार तुम्ही सोने खरेदी करु शकाल.
नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : धनत्रयोदशीला दागदागिन्यांच्या खरेदीची प्लॅनिंग करत असाल तर आज सराफा बाजारात गर्दीच गर्दी असेल. पण अशावेळी हैराण होण्याची गरज नाही. गर्दीत जाण्याची इच्छा नसेल आणि धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त पण चुकवायचा नसेल तर अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. याठिकाणी शुद्ध सोने खरेदी करता येईल. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करु शकता. सोन्याच्या दागिन्यापेक्षा डिजिटल गोल्डचा पर्याय पण चांगला आहे. त्याची खरेदी पण एकदम सोपी आहे. तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून ही खरेदी करु शकता. ही खरेदी तुम्ही इतर पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करु शकता.
असे खरेदी करा शुद्ध सोने
त्यासाठी मोबाईलमध्ये पेटीएम ऐप इंस्टॉल करा. गुगल पे अथवा एपल स्टोअरवर ते सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा. ऐप उघडल्यानंतर बँक खात्याशी ते लिंक करा. त्यानंतर तुम्ही यावर सहज शॉपिंग करु शकाल.
- पेटीएमच्या होमपेजवर जा. सर्च बारमध्ये Gold सर्च करा. त्यात Gold आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- सोने खरेदीसाठी त्याची किंमत आणि वजन लिहिलेले असेल
- पेटीएमवर तुम्ही दोन प्रकारे सोने खरेदी करु शकता
- तुम्ही किंमतींच्या आधारे सोने खरेदी करु शकता
- वजनाआधारे सोन्याची खरेदी करता येईल
- दोन्हीपैकी एक पर्याय निवडा आणि ऑनलाईन पेमेंट करा
- पण त्यापूर्वी प्रोमो कोड तपासा. त्याचा तुम्हाला फायदा होईल
डिजिटल सोने
डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोने खरेदीसाठी मदत करतात. सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची असेल तर डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. ग्राहक यामध्ये केव्हाही खरेदी-विक्री करु शकतो. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते.
गोल्ड म्युच्युअल फंड
केवळ सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हा चांगला पर्याय आहे. गोल्ड फंड हा एकप्रकारचा म्युच्युअल फंडच असतो. यामध्ये घरबसल्या तुम्ही फिजिकल गोल्ड न खरेदी करता गुंतवणूक करु शकता. हे गोल्ड फंड, गोल्ड ईटीएफमध्येच गुंतवणूक करतात. याची खरेदी-विक्री सोपी असते. तुम्ही कोणतीही बँक, गुंतवणूक एजंट अथवा म्युच्युअल फंडच्या संकेतस्थळावरुन यामध्ये ऑनलाईन खरेदी करु शकता.