Petrol Diesel Price : तेल कंपन्यांचे हे लटके कारण अजून किती दिवस..आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्तात मिळत आहे इंधन..

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या चार महिन्यांपासून घसरणीवर आहेत. पण त्याचा काहीच फायदा जनतेला का मिळत नाहीये?..

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांचे हे लटके कारण अजून किती दिवस..आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्तात मिळत आहे इंधन..
पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 12:35 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाचे भाव (Crude Oil) गेल्या चार महिन्यांपासून घसरणीवर आहेत. पण त्याचा काहीच फायदा जनतेला का मिळत नाहीये? गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती नरम पडल्या आहेत. क्रूड ऑईलच्या किंमती अनेक दिवसांपासून 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरु आहे. पण 25 सप्टेंबर रोजी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) काहीच बदल झालेला नाही.

पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी यामागचं कारण सांगितले आहे. तेल कंपन्यांचे गेल्या काही दिवसांपासून नुकसान भरुन निघाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले असले तरी त्याचा फायदा देशभरातील वाहनधारकांना झाला नाही. तोट्याचे भांडवल करुन कंपन्या दर कपातीला विरोध करत आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घसरण सुरु आहे. एप्रिल महिन्यात मात्र रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका तेल कंपन्यांना बसला. त्यांना चढ्या दराने, वाढीव भावाने इंधन खरेदी करावे लागेल. पण देशात त्यांना किंमती वाढविता आल्या नाही. त्यामुळे तेल कंपन्यांचे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा

7 एप्रिल 2022 रोजीपासून किंमतीत बदल झालेला नाही. 22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तर काही राज्यांनीही त्यांच्या शुल्कात कपात केली होती. अबकारी कर कमी झाल्याने काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 10 रुपयांची सवलत मिळाली.

एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता . इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून इंधनाचे दर जाणून घेता येतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.