Cryptocurrency मध्ये गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या एन्ट्री आणि एक्झिटची योग्य वेळ

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासाठी प्रवेश आणि निर्गमन धोरण काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. | Cryptocurrency

Cryptocurrency मध्ये गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या एन्ट्री आणि एक्झिटची योग्य वेळ
क्रिप्टोकरन्सी
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 6:42 AM

मुंबई: अलीकडच्या काळात अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विकसित देशांमधील केंद्रीय बँका त्यांच्या डिजिटल चलनावर काम करत आहेत. तथापि, आतापर्यंत त्याला फक्त एकाच देशात कायदेशीर मान्यता मिळाली आहे – अल साल्वाडोर. तरीही क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासाठी प्रवेश आणि निर्गमन धोरण काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कारण जगभरातील मध्यवर्ती बँकांनी बाजारपेठेत चलनाची तरलता वाढवण्याच्यादृष्टीने धोरणे आखली आहेत. त्याचा फायदा क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला होताना दिसत आहे. एप्रिल 2021 मध्ये, एका बिटकॉइनचा भाव 64 हजार डॉलर्सवर पोहोचला होता.

महिन्याला 8 ते 10 टक्के रिटर्न्स मिळवा

क्रिप्टो मार्केटमध्ये झटपट परतावा मिळत असल्याने अनेक हेज फंड आणि गुंतवणूक बँका त्यात उघडपणे सहभागी होत आहेत. तज्ञ सल्ला देतात की क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना अस्थिरता कायम राहते. अशा परिस्थितीत, मोठ्या परताव्याऐवजी, गुंतवणूकदारांनी मासिक 8-10 टक्के परताव्याचा विचार केला पाहिजे. या पद्धतीच्या मदतीने दर महिन्याला तुमचा पोर्टफोलिओ अपडेट आणि अपग्रेड करा. जर तुम्ही हे करण्यास सक्षम असाल तर तुम्हाला वर्षाला 125% पेक्षा जास्त परतावा मिळेल.

थोडी-थोडी गुंतवणूक करा

बाजारातील चढ -उतारांमधून शिकलेले गुंतवणूकदार म्हणतात की क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम सूत्र म्हणजे ‘डॉलर कॉस्ट एव्हरेजिंग’. तुम्हाला कोणत्याही डिजिटल चलनात गुंतवायचे आहे, एकाच वेळी सर्व गुंतवणूक करण्याऐवजी, थोडी थोडी गुंतवणूक करा. यामुळे बाजारपेठेतील अस्थिरतेचा जास्त फटका बसणार नाही.

कधी खरेदी कराल, कधी विक्री कराल?

एक्झिट स्ट्रॅटेजी काय असेल, ते तुम्हाला किती परतावा पाहिजे यावर अवलंबून आहे. आर्थिक बाजारात “अफवेवर खरेदी करा, बातमीवर विक्री करा.” फॉर्म्युला खूप जुना आहे आणि त्याचा काहीप्रमाणात अवलंब करा. याचा अर्थ असा की जेव्हा अफवांचा बाजार गरम असतो, तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा त्याबद्दल बातम्या येणार आहेत, तेव्हा विका.

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनालिससची मदत घेणे चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारातील बहुतेक गुंतवणूकदार, मग ते लहान असो वा मोठे, तांत्रिक निर्देशकांच्या आधारे खरेदी आणि विक्री करतात. कारण यामुळे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला ओव्हरबॉट झोन आणि ओव्हरसोल्ड झोनबद्दल माहिती मिळू शकेल. त्यामुळे खरेदी आणि विक्री नेमकी कोणत्या पातळीवर करायची, याचा अंदाज तुम्हाला येईल.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश

आता बिटकॉईन वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा; Amazon कडून लवकरच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना सुरुवात

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत नोकऱ्यांची अमाप संधी, भारतात 10 हजार तंत्रज्ञांची गरज, 75 लाखांपर्यंतची सॅलरी पॅकेजेस

बिटकॉइन टिक्का, इथेरियम बटर चिकन, ‘या’ हॉटेलमध्ये मिळतेय क्रिप्टो थाळी, पेमेंटसाठीही क्रिप्टोकरन्सीचा वापर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.