क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय, जाणून घ्या फायदे आणि धोके
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासाठी प्रवेश आणि निर्गमन धोरण काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कारण जगभरातील मध्यवर्ती बँकांनी बाजारपेठेत चलनाची तरलता वाढवण्याच्यादृष्टीने धोरणे आखली आहेत. त्याचा फायदा क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला होताना दिसत आहे. | Cryptocurrency
मुंबई: अलीकडच्या काळात अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विकसित देशांमधील केंद्रीय बँका त्यांच्या डिजिटल चलनावर काम करत आहेत. तथापि, आतापर्यंत त्याला फक्त एकाच देशात कायदेशीर मान्यता मिळाली आहे – अल साल्वाडोर. तरीही क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासाठी प्रवेश आणि निर्गमन धोरण काय असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कारण जगभरातील मध्यवर्ती बँकांनी बाजारपेठेत चलनाची तरलता वाढवण्याच्यादृष्टीने धोरणे आखली आहेत. त्याचा फायदा क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला होताना दिसत आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* ही एक केंद्रीकृत मालमत्ता आहे. आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. अशा स्थितीत सरकारकडून या संदर्भात आतापर्यंत कोणताही हस्तक्षेप झालेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असते.
* संपूर्ण जगात क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाते. हे कोणत्याही देशाच्या सीमांच्या आधारावर विभागलेले नाही. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी असेल, तर तुम्ही ती संपूर्ण जगात वापरू शकता.
* क्रिप्टो एक्सचेंज 24 तास आणि 7 दिवस काम करतात. स्टॉक मार्केट एक्स्चेंजप्रमाणे, ते आठवड्यातून फक्त पाच दिवस आणि सकाळी 9.15 ते दुपारी 3.35 पर्यंत काम करत नाही. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही बदल हवा तेव्हा करू शकतो. तो खरेदी आणि विक्रीही कधीही करू शकतो.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे धोके?
* क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही वित्तीय संस्थेचे समर्थन नाही. तसे ते नियमन केलेले नाही. यामुळेच एखादा गुंतवणूकदार यात अडकला तर त्याला मदत करणारे कोणीच नसते. आपली फसवणूक झाली तरी मदत मिळण्याची सक्यता नसते. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच आहे.
* ही एक डिजिटल मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत, सायबर गुन्हेगार ते हॅक करू शकतात आणि ते तुमच्या वॉलेटमधून चोरू शकतात. हा सर्वात मोठा धोका आहे. हे तंत्रज्ञान अजून खूप नवीन आहे. तुम्हाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोर्टफोलिओचा एक छोटासा भाग त्यात ठेवा.
* क्रिप्टोकरन्सीची दुसरी समस्या म्हणजे अस्थिरता. त्याची किंमत खूप लवकर वाढते आणि खूप लवकर पडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीच्या वेळी प्रवेश केला तर घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळेची वाट पहा आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार बना.
संबंधित बातम्या:
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करुन मालामाल होण्याची संधी, पण गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
Cryptocurrency मध्ये गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या एन्ट्री आणि एक्झिटची योग्य वेळ
क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश