आता आयपीपीबीच्या अ‍ॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?

आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने देखील आपल्या ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली.

आता आयपीपीबीच्या अ‍ॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:44 PM

मुंबई : सध्या डिजिटलचा जमाना आहे. तुम्ही अवघ्या एका क्लिकवर एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG gas cylinder) बुकिंग करू शकता. इंडेन गॅस (Indane Gas) एचपी गॅस (HP Gas)  आणि भारत गॅस   (Bharat Gas) अशा प्रमुख कंपन्यांनी तर मोबाईच्या अवघ्या एक मीस कॉलवर गॅस बुकिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना सहज गॅस बुक करता येतो. मात्र आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने देखील आपल्या ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली.

ट्विट करत दिली माहिती 

आयपीपीबीने ट्विट करत पोस्टाच्या या नव्या सुविधेबाबत माहिती दिली आहे. सोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. आता आमच्या ग्राहकांना आयपीपीबी अ‍ॅपच्या माध्यमातून गॅस सिलिंडरची बुकिंग करता येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबत शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड कसे करायचे, खाते कसे ओपन करायचे इथपासून ते गॅस सिलिंडर कसे बूक करायचे इथपर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहे.

आयपीपीबीच्या अ‍ॅपवर ‘असे’ करा गॅसचे बुकिंग

सर्वप्रथम तुमच्या मोबाईवर आयपीपीबीचे अ‍ॅप डाऊनलोड करा.

त्यानंतर त्या  अ‍ॅपमध्ये तुमचा रजिस्टर नंबर एंटर करा.

रजिस्टर नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल.

ओटीपी मिळाल्यानंतर तो एंटर करा.

ओटीपी टाकताच तुमचे अ‍ॅप ओपन होईल.

या अ‍ॅपमध्ये बिल असा एक पर्याय आहे.

ज्या मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गॅसची बुकिंग करू शकता.

गॅसची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोहोच गॅस उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या 

Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा

माझे रेशन अ‍ॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.