DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीला मोठे गिफ्ट! महागाई भत्त्याची प्रतिक्षा संपली, महिन्याच्या शेवटी खात्यात येणार लक्ष्मी
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांचा महागाई भत्ता मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस या दिवशी ही गोड वार्ता मिळू शकते.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) या नवीन वर्षांत मूळ वेतनात वाढीची शक्यता आहे. तर आता आणखी एक गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस महागाई भत्ता (Dearness Allowance) निश्चित होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीलाच ही गोड वार्ता मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाला त्यांच्या एकूण पगाराने गुणले जाते, त्याआधारे फिटमेंट फॅक्टर ठरविल्या जाते. फिटमेंट फॅक्टर हे मूळ वेतन ठरविण्याचे एक सामान्य मूल्य आहे. किमान वेतन (Minimum Wage) अर्थात मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या किमान वेतन 18,000 रुपये आहे. आता त्यात वाढ होऊन किमान वेतन 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकेल.
येत्या 15 दिवसांत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल. डीए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 31 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय होईल. AICPI इंडेक्सचा डेटा दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला येतो. 31 जानेवारी रोजी डिसेंबर 2022 मधील आकडे समोर येतील. त्याआधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल.
या वर्षात 2023 पहिल्या सहामाहीत जानेवारी ते जून 2023 मध्ये महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) होत नाही. मार्च 2023 मध्ये याविषयीची घोषणा करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत महागाई भत्ता निश्चित होईल. महागाई भत्ता AICPI इंडेक्सवर आधारीत आहे.
कामगार मंत्रालय महागाईचा लेखाजोखा बघता महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेते. आतापर्यंत नोव्हेंबर 2022 पर्यंतचे आकडे आले आहेत. इंडेक्सचा क्रमांक 132.5 वर आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढेल. डिसेंबरमधील महागाईत वाढ झाल्यास हा भत्त्यात 4% वाढ करण्यात येईल.
तज्ज्ञांच्या मते, सीपीआय महागाई (CPI Inflation) दर 12 जानेवारी प्राप्त झाला. महागाई दर एक वर्षाच्या निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. हा दर 5.72% झाला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.88% होती. नोव्हेंबर महिन्यातही महागाई घटली होती.
पण AICPI इंडेक्समध्ये कोणताच बदल झाला नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये AICPI इंडेक्स 132.5 अंकावर होता. नोव्हेंबर हा इंडेक्स स्थिर होता. ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक 132.5 वर होता. तज्ज्ञांच्या मते ग्राहक निर्देशांक डिसेंबर महिन्यात स्थिर राहण्याची शक्यता आहे.
डिसेंबर 2022 मध्ये निर्देशांक स्थिर राहिला तर महागाई भत्त्यात 3% टक्के वाढ होईल. सातव्या वेतन आयोगात (7th Pay Commission) महागाई भत्त्यात वाढ होऊन तो 41% होईल. जुलै 2022 मध्ये 38% महागाई भत्ता निश्चित आहे. मूळ वेतन 18000 रुपये असेल तर महागाई भत्ता 6 हजार 840 रुपये प्रति महिना मिळेल.