DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील महिन्यात महागाई भत्त्यात वाढ?, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार डीए

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार लवकरच घोषणा करू शकते.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील महिन्यात महागाई भत्त्यात वाढ?, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार डीए
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 8:48 AM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढच्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत (Salary) सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. जुलैमध्ये केंद्रीय कर्मचारी तसेच पेंशनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार (Central Government) एक जुलैला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. ऑल इंडिया कंझ्यूमर इंडेक्सच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. चालू वर्षात जानेवारी महिन्यामध्ये सातव्या वेतनआयोगानुसार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. जानेवारीत महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. एप्रिल आणि जून महिन्यात ऑल इंडिया कंझ्यूमर इंडेक्स हा 126 च्या वर राहिल्याने जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर 34 टक्के डीए देण्यात येत आहे. त्यात जुलैमध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यास तो 38 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

डीएमध्ये वाढ केल्यास पगार किती वाढणार ?

डीए ठरवताना तो ऑल इंडिया कंझ्यूमर इंडेक्सच्या आधारावर ठरवला जातो. ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन हे 18 हजार रुपये आहे, त्या वेतनाला प्रमाण धरून डीएची रक्कम ठरवली जाते. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना 34 टक्के डीए देण्यात येत आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार हा 18 हजार रुपये इतका असेल तर त्या कर्मचाऱ्याला 6,120 रुपये इतका महागाई भत्ता मिळतो. जुलैमध्ये डीए चार टक्क्यांनी वाढल्यास ही रक्कम 6,840 रुपयांवर पोहोचेल. याचाच अर्थ डीएमध्ये 720 रुपयांची वाढ होईल.

वर्षातून दोनदा डीएमध्ये वाढ

वाढत्या महागाईपासून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोनदा डीएमध्ये वाढ करते. पहिली वाढ ही वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये करण्यात येते. तर दुसऱ्यांदा जुलैमध्ये डीए वाढवण्यात येतो. ऑल इंडिया कंझ्यूमर इंडेक्सच्या आधारावर डीए किती वाढवण्यात यावा याबाबत निर्णय घेण्यात येतो. गेल्या एप्रिल आणि जून महिन्यात ऑल इंडिया कंझ्यूमर इंडेक्स हा 126 च्या वर राहिल्याने पुढील महिन्यात डीएमध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डीए वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये देखील वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.