iNCOVACC : कोरोनाला रोखा नाकावाटे! नेझल लसीला DCGI ची मंजूरी, कोविडला नाकातच गुदमरवणार..
iNCOVACC : कोरोना रोखण्यासाठी नाकावाटे लस देण्यास मंजूरी देण्यात आली आहे..
नवी दिल्ली : आता कोरोनाला पायाबंद घालण्यासाठी आणखी एक प्रभावी लस उपलब्ध झाली आहे. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला (Nasal Vaccine) हिरवा कंदिल मिळाला. कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) शुक्रवारी नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीला मंजूरी दिली. त्यामुळे अतिदक्षता विभागात अथवा आपत्कालीन स्थिती (Emergency) या लसीचा वापर करता येणार आहे.
iNCOVACC असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेकने ही लस विकसीत केली आहे. या लसीचे प्रयोग सुरु होते. कोणत्या लसीसाठी अगोदर DCGI ची मंजूरी घेणे आवश्यक असते. त्यानंतर लसीचा वापर करता येतो.
कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हैदराबाद येथील लस तयार करणारी कंपनी, भारत बायोटेकच्या या लसीला परवानगी दिली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या लसीचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
iNCOVACC ही भारतातील नाकावाटे घेतली जाणारी पहिली लस आहे. जिच्या वापराला आता परवानगी देण्यात आली आहे. खरं म्हणजे हा बूस्टर डोस आहे. सध्या अत्यंत आवश्यकतेसाठी या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.
ही लस त्याच लोकांना देण्यात येणार आहे. ज्यांनी कोविशील्ड अथवा कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहे. म्हणजे ही लस तिसरा बुस्टर डोस ठरेल. त्यामुळे रुग्णांना कोविड संक्रमणाचा धोका कमी होईल आणि ते या संक्रमणाला बळी पडणार नाहीत.
मीडिया रिपोर्टनुसार, इंट्रानेझल इम्युनायझेशन नाकात इम्यून रिस्पॉन तयार करतात. भारतात कोरोनाविरोधात लसीची व्यापक मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या लोकसंख्येला व्हॅक्सिनेशन करण्यात आले आहे.
कोविडविरोधात सध्या भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही लस प्रभावी ठरल्या आहेत. त्यामुळे कोविड संक्रमणाला आळा बसण्यात मदत झाली आहे. तसेच 10 एप्रिल 2022 पासून देशात बुस्टर डोसही देण्यात येत आहे.
आता नीडल फ्री लस मिळणार असल्याने त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या आपत्कालीन परिस्थितीतच ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.