Driving Licence | तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपली? कशा प्रकारे करा चेक करायची डेडलाइन?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम पाहता दिल्ली सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी अर्जदारांना ट्रेनिंग सेंटर मध्ये यावं लागेल आणि कोरोनामध्ये सेंटर बंद ठेवले गेले आहेत म्हणूनच सरकारने लायसन्सची वैधता तीन महिन्या पर्यंत वाढवली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये काही ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving licence) वैधता वाढवली गेली आहे. ज्या लायसन्सची वैधता 1 फेब्रुवारी 2020 ते 31 जानेवरी 2022 ला संपत आहे त्याची वैधता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ,आता अशा प्रकारचे लायसन्स 31 मार्च 2022 पर्यंत स्वीकारले जातील.खरेतर सरकारद्वारे ही सवलत सर्व डीएल(DL validity) म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स वर नाहीये. या निर्णयाबद्दल दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी नुकतीच माहिती दिली आहे की कोरोनाच्याच्या (Corona pandemic) तिसऱ्या लाटेला विचार करून सरकारने वैधताची मर्यादा वाढवलेली आहे ,आता लायसन्स रिन्यू करण्यासाठी पुढील दोन महिन्याचा अतिरिक्त कालावधी सर्वांना मिळालेला आहे.
दिल्ली सरकारच्या मते हा निर्णय सर्व लर्निंग लायसन्स आणि हेवी ड्रायव्हिंग लायसन्स होल्डर ह्याकरिता घेण्यात आला आहे.कैलाश गहलोत यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, दिल्लीच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करता परिवहन विभागाने सर्व लर्निंग लायसन्स आणि हेवी ड्रायव्हिंग लायसन्स यांची वैधता पुढील तीन महिने वाढवण्याचा विचार केलेला आहे म्हणजेच 31.03.2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री श्री @ArvindKejriwal जी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठी मागे उभी आहे. दिल्ली सरकारने कोरोनाचा वाढता संक्रमण विचारात घेता हे पाऊल उचलले आहे. आता 31 मार्चपर्यंत लर्निंग आणि हेवी लायसन ड्रायव्हिंग लायसन्स वैध राहतील.
असा झाला निर्णय
यातच दिल्ली सरकारने एक निर्णय सुद्धा घेतला आहे की कोरोनाचा विचार करत असताना ड्रायव्हिंग स्कूल टेस्ट आणि नवीन अपॉइंटमेंट सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. लोनी रोड आणि सराय काले खां येथील आईडीटीआर सेंटर वर डीटीआई बुराड़ी मधील सर्व प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि क्लास रूम ट्रेनिंग यांना कोरोना चा दिवसेंदिवस वाढता संक्रमण लक्षात घेता हे सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. सरकारने असे म्हटले आहे की हेवी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्जदारांना ट्रेनिंग सेंटर मध्ये यावे लागेल. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स साठी यावे लागते. येथे पूर्णपणे प्रक्टिकल ट्रेनिंग होते आणि येथे उमेदवाराला सेंटरमध्ये उपस्थित राहावे लागते म्हणूनच आता या सर्विसला बंद ठेवण्यात आलेले आहे. या कारणामुळे अनेक कमर्शियल व्हेहीकल ड्रायव्हर यांना आपले लायसन्स रिन्यू करता येत नाहीये.
ड्रायव्हर आणि लर्निंग ड्रायव्हर यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देत दिल्ली सरकारने लायसन्स वैधता 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. या प्रक्रियेला जानेवारी महिन्यापासून पुढील 3 महिन्या पर्यंत वाढविण्यात आले आहे. सरकारने असे म्हटले आहे की ,कोरोनाची एकंदरीत परिस्थिती पाहता लर्निंग लायसन्स रिन्यू करणाऱ्यांना ऑनलाईन स्लॉट किंवा ऑनलाइन अपॉइंटमेंट नाही मिळत आहे.या होणाऱ्या गैरसोयींमुळे दिल्ली सरकारने लायसन्स वैद्यता 31 मार्चपर्यंत वाढवून दिलेली आहे.
कामाच्या इतर बातम्या :
बॉर्डर सिक्योरिटी फोर्समध्ये (BSF) भरती व्हायचंय? आत्ताच भरा अर्ज, अशी करा तयारी!
आता QR कोडच्या मदतीने ओळखा खरी आणि बनावट औषधे, लवकरच नवीन नियम लागू होणार