महिन्याला पाच हजार रुपये जमा करा आणि मिळवा 15 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही

PPF account | राष्ट्रीय बचत संघटनेने 1968 मध्ये PPF ही छोटी बचत योजना म्हणून सुरू केली. सध्याच्या व्याजदरानुसार PPF मध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवून 15 लाख रुपये साठवले जाऊ शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.

महिन्याला पाच हजार रुपये जमा करा आणि मिळवा 15 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही
पेन्शन
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:11 AM

नवी दिल्ली: तुम्ही कोणतीही जोखीम न पत्कारता सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्यायाच्या शोधात असाल तर सार्वजनिक भविष्य निधी (PPF) उत्तम ठरु शकतो. यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पीपीएफमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. वास्तविक, ही योजना सरकारकडून पूर्णपणे संरक्षित आहे. त्यात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्यासाठी काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याची गरज आहे. या योजनेमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून चांगले परतावा मिळू शकतो.

राष्ट्रीय बचत संघटनेने 1968 मध्ये PPF ही छोटी बचत योजना म्हणून सुरू केली. सध्याच्या व्याजदरानुसार PPF मध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवून 15 लाख रुपये साठवले जाऊ शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. पीपीएफ खात्यावर 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे. 5,000 रुपये दरमहा या आधारावर तुम्ही 15 वर्षांत एकूण 9 लाख रुपये जमा कराल. यावर, सध्याच्या दरानुसार, तुम्हाला 6,77,840 रुपये व्याज मिळतील, म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला 15.78 लाख रुपये मिळतील.

कर्जही काढण्याची सुविधा

तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. आपण पीपीएफ खाते उघडले त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एका आर्थिक वर्षापासून ते पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पीपीएफकडून कर्ज घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. जर आपण जानेवारी 2017 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त 25% कर्ज घेऊ शकता.

पीपीएफ खाते कोणत्याही न्यायालय किंवा आदेशाद्वारे कर्ज किंवा इतर उत्तरदायित्वाच्या वेळी जप्त करणे शक्य नाही. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडले जाऊ शकते. नियमांनुसार पीपीएफ खाते हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (एचयूएफ) नावे उघडता येत नाही.

संबंधित बातम्या:

PPF अकाऊंटवरही मिळू शकते अत्यंत कमी व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही

PPF खात्याचे 5 मोठे फायदे, छोट्या बचतीवर बंपर रिटर्न मिळण्याची संधी

PPF | मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड जमवा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.