सावधान! स्वस्ताईतील ऑफर्स करतील बँक खाते रिकामे

Diwali Offers Scam | दिवाळीच्या काळात ऑफर्सचा भडीमार सुरु आहे. अनेक ऑफर्सने ग्राहकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. कोणत्या प्रकारचा विचार न करता काही ग्राहकांनी खरेदीचा धडका लावला आहे. त्यात ऑनलाईन तर अनेक आकर्षक ऑफर्स आहेत. व्हॉट्सअप, ईमेल यासह इतर सोशल प्लॅटफॉर्मवर ऊत आला आहे. अशावेळी जरा सावध, नाहीतर तुम्हीच दिवाळीत सावज ठराल.

सावधान! स्वस्ताईतील ऑफर्स करतील बँक खाते रिकामे
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 11:32 AM

नवी दिल्ली | 11 नोव्हेंबर 2023 : सध्या दिवाळीची धूम सुरु आहे. खरेदीचे वातावरण आहे. उत्साह आहे. आनंद ओसंडून वाहत आहे. अनेक कंपन्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दिवाळीत विक्रीसाठी ऑफर्सचा भडीमार करत आहेत. पण अनेकदा घरातील कामाच्या व्यस्ततेमुळे घराबाहेर पडणे जमत नाही. ऑनलाईन शॉपिंगचा मोह आवरत नाही. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर पण अनेक जाहिरातींचा, डिस्काऊंटचा ऊत आला आहे. पण या सर्वच जाहिराती काही तुमचा फायदा करण्यासाठी नसतात. त्यातील काही तर तुम्हाला जाळ्यात ओढून फसवणूक (Diwali Online Scam Alert) करणाऱ्या पण असतात. तेव्हा मोहात कोणत्याही अनाधिकृत वेबसाईटवर, लिंकवरुन खरेदी करु नका. नाहीतर बँकेतील बोनस आणि पगार एकदाच गायब होईल.

Diwali Offer पासून दूर राहा

सायबर गुन्हेगारांनी तुम्हाला फसवण्यासाठी ऑनलाईन जाळे टाकले आहे. खोटा बँक कॉल, खोट्या ऑफर्सचा एसएमएस, ई-मेल यामध्ये आमिषं दाखवले जाते. दिवाळीत अनेकांच्या बँक खात्यात पैसा आलेला आहे. त्याचा फायदा साबर भामटे उचलतात. तुम्हाला सवलतीचे आमिष दाखवून लिंक पाठवण्यात येते. तुम्ही एकदा त्यावर क्लिक केले तर पुढील काही मिनिटात तुमच्या खात्यातील रक्कम गायब होते. काहीप्रकरणात तर कॉलवर काही मिनिटं संभाषण झाल्यानंतर ही बँक खाते खाली झाल्याचे समोर आले आहे. तुमची खासगी माहिती, बँकेचा तपशील चोरुन हा गंडा घातल्या जातो.

हे सुद्धा वाचा

या आमिषाला म्हणा ना

सणासुदीच्या काळात डिस्काऊंट, कॅशबॅकची प्रलोभनं दाखविण्यात येतात. अथवा स्क्रॅच कुपन, बक्षीस असे फंडे वापरले जातात. एकावर एक फ्री, कम्बो ऑफर्स अशा अनेक युक्त्या लढवल्या जातात. या व्हायरल मॅसेजच्या तुम्ही एकदा प्रेमात पडला की तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्या जातो. सुरुवातीला कॉल येतो. मग लिंक पाठवण्यात येते. अथवा तुम्ही थेट लिंकवर क्लिक केले की माहिती चोरुन बँक खाते खाली करण्यात येते. त्यामुळे आशा आमिषांना ना म्हणा. ई-कॉमर्सच्या वेबसाईटची खात्री करुनच मग व्यवहार करा.

Free Gifts Diwali Offers

अशा प्रकारच्या ऑफर्स तुमचे दिवाळीत दिवाळे काढतील. स्कॅमर्स अशा ऑफर्सचा महापूर आणतात. सोशल मीडियावर ज्या पोस्ट असतात. त्यावर फेक अकाऊंटमधून पसंतीच्या कमेंट करण्यात येतात. त्यामुळे आपला त्यावर विश्वास बसतो. त्यांची लिंक क्लिक केली आणि स्क्रोल केले की तुमची शिकार केली जाते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.