तुम्हाला LKG आणि UKG चा फुलफॉर्म माहिती आहे का?
आपल्याकडे पाश्चात्य देशांमधील अनेक शैक्षणिक गोष्टींचे अनुकरण केले जात असले तरी यापैकी अनेक गोष्टींचा अर्थ आपल्याला ठाऊक नसतो.
मुंबई: आपल्याकडे पाश्चात्य देशांमधील अनेक शैक्षणिक गोष्टींचे अनुकरण केले जात असले तरी यापैकी अनेक गोष्टींचा अर्थ आपल्याला ठाऊक नसतो. LKG आणि UKG हे दोन शब्द अशाच गोष्टींपैकी एक आहेत. लहान मुलांच्या शिक्षणाच्याबाबतीत (Education) हे दोन शब्द वापरले जातात. मात्र, याचा संपूर्ण अर्थ अनेकांना सांगता येणार नाही. (Do you know full form of LKG and UKG)
लहान मुलं जेव्हा पहिल्यांदा शाळेत जाते त्याला प्राथमिक गोष्टी आणि लिहायला-वाचायला शिकवले जाते. त्या शैक्षणिक टप्प्याला LKG अर्थात Lower Kindergarten म्हणतात. Kindergarten या शब्दाचा अर्थ बालविहार किंवा बालोद्यान असा होतो. LKG तीन ते चार वर्षापर्यंतच्या मुलांना शिकवले जाते.
तर UKG अर्थात Upper Kindergarten मध्ये चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना शिक्षण दिले जाते. LKG मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना Upper Kindergarten मध्ये प्रवेश दिला जातो. या दोन्ही टप्प्यात विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला जातो. सर्वात प्रथम मुलं नर्सरी आणि LKG मध्ये शिक्षण घेतात. दोन्ही ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर त्यांना UKG मध्ये प्रवेश मिळतो. UKG हा पहिलीच्या वर्गात जाण्यापूर्वीचा टप्पा असतो.
इतर बातम्या:
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही
तुमच्याकडे असलेले सोनं खरं की खोटं? आता घरबसल्या करा शुद्धतेची तपासणी
एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान
(Do you know full form of LKG and UKG)