Government Scheme : विवाहित महिलांसाठी सरकारची जबरदस्त योजना, अकाऊंटमध्ये जमा होणार 5,000 रुपये
Government Scheme For Women : केंद्र सरकारकडून विविध योजना चालवल्या जातात. त्या अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. अशाच एका योजनेतंर्गत विवाहित महिलांना 5,000 रुपये मिळतात. त्या बद्दल जाणून घ्या.
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. पीएम किसान योजनेतंर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. याचप्रमाणे विवाहित महिलांसाठी सुद्धा सरकारकडून योजना चालवली जाते. केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी काही खास योजना चालवल्या जात आहेत.
मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सरकार गर्भवती महिलांना 5000 हजार रुपये देते. या योजनेतंर्गत गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. मुलं कुपोषित राहू नयेत, त्यांना कुठलाही आजार होऊ नये, यासाठी महिलांना मातृ वंदना योजनेतंर्गत पैसे दिले जातात.
या स्कीमच वैशिष्टय काय?
– गर्भवती महिलांच वय कमीत कमी 19 वर्ष असलं पाहिजे.
– या स्कीमसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
– 5000 रुपयाची रक्कम सरकार 3 हफ्त्यांमध्ये ट्रान्सफर करेल.
– या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली होती.
पैसे कसे मिळणार?
योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतील. गर्भवती महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये हे पैसे थेट ट्रान्सफर होतील.
चेक करा ऑफिशियल वेबसाइट
तुम्ही ऑफिशियल वेबसाइटववर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana सुद्धा संपर्क करु शकता. इथे तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल.