LPG Price Hike : दूध महागलं, पेट्रोल डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरही महागले, चेक करा आजचे रेट

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. भारतात तेल खरेदी कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी सिलिंडर LPG Cylinder) दरात वाढ केली.

LPG Price Hike : दूध महागलं, पेट्रोल डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरही महागले, चेक करा आजचे रेट
आजपासून 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागलाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:08 AM

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. भारतात तेल खरेदी कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी सिलिंडर LPG Cylinder) दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुध्दा वाढ होत आहे. भारतात पेट्रोल दरात (petrol rate) 80 पैशांनी वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात काही कंपन्यांनी दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ केली होती. दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर (आजचे दर)

पुणे – 952.5 नागपूर – 1,001.5 नाशिक – 953 औरंगाबाद – 958.5 मुंबई – 949.5

सिलेंडर महाग झालेल्या दराची  माहिती गोल्ड ईटर्न संकेतस्थळावरून घेतली आहे.

सिलिंडर 50 रुपयांनी महागला

आजपासून 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. साधारण पाच महिन्याच्या कालावधीनंतर सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपये झाली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होते.

कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर

पंश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे एलपीजी सिलेंडरची वाढलेली किंमत 976 रूपये झाली आहे. याच्या आगोदर कोलकत्ता शहरात सिलेंडरची किंमत 926 रूपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिलेंडरची किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाटणामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांपर्यंत वाढली आहे.

मुंबई चन्नई किती महागला सिलेंडर

मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 899.5 रुपये होता, सध्याचा दर एलपीजी सिलेंडरचा दर 949.5 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर 915.5 रुपये होता. सध्याचा दर एलपीजी सिलिंडरचा दर 965.5 रुपये झाला आहे.

या कारणामुळे वाढले दर

4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तेल खरेदी कंपन्यांनी कच्च्या तेलाची ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी इंधनाच्या दरात वाढ झाली.

Petrol Diesel Rates in Maharashtra : साडे चार महिन्यानंतर इंधनदरवाढीचा भडका, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांचे दर एका क्लिक वर

Mumbai Pune Mumbai प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी, अराखीव कोचसह मासिक पास सुविधा सुरु

Vainganga River | ‘जीवनदायिनी’ वैनगंगा ठरतेय ‘मृत्यूवाहिनी’, दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.