नाही भीती, नाही चिंता, तरीही जोरदार परतावा, सोन्यातील गुंतवणूकीचा हा पर्याय निवडा

Digital Gold | भारतात सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अनेक वर्षांपासून भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करत आले आहे. सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. सोन्याचे दाग-दागिने खरेदी करण्यापेक्षा आता डिजिटल गोल्डचा पण चांगला पर्याय आहे. या गुंतवणुकीवर तर चांगला परतावा पण मिळतो.

नाही भीती, नाही चिंता, तरीही जोरदार परतावा, सोन्यातील गुंतवणूकीचा हा पर्याय निवडा
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 11:21 AM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : सणासुदीत सोने खरेदीची भारतीयांची जुनी परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदीचा रतीब आहे. धनत्रयोदशीला पण अनेक जण सोने खरेदीची योजना आखत आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या स्वस्ताई सराफा बाजार फुलला आहे. दागदागिने अथवा ठोक सोने घेण्यापेक्षा आता डिजिटल सोन्याचा पण चांगला पर्याय समोर आला आहे. ज्वेलरीपेक्षा या पर्यायांमध्ये अधिक रिटर्न मिळतात. त्याचे इतर ही अनेक फायदे आहेत. सोने घरात असले की त्याची चोरीची, सुरक्षेची चिंता सतावते. पण डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला या चिंतेतून मुक्त करतो आणि अधिक फायदा मिळवून देतो.

सर्वात चांगला पर्याय

सध्याच्या काळात डिजिटल गोल्ड हा सर्वात जोरदार पर्याय आहे. त्यामाध्यमातून तुम्हाला जोरदार परतावा मिळतो. यामध्ये केंद्र सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds) सर्वात लोकप्रिय आहे. तर पेपर गोल्ड हा पण एक चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे प्रमाणपत्र पण मिळते. त्यात तुमच्या सोने खरेदीचा भाव पण नोंद असतो. गोल्ड म्युच्युअल फंड पण ट्रेंडिंग आहे.

हे सुद्धा वाचा

गोल्ड बाँड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली होती. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. या योजनेत हिंदू अविभाजीत कुटुंबाला 4 किलो तर संस्थेला 20 किलो सोने खरेदी करता येते. सुवर्ण रोखे खरेदीनंतर सुरक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क अदा करावे लागत नाही. प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप आहे.

Gold ETF

गोल्ड बाँडमधील गुंतवणूक महाग वाटत असेल तर ऑनलाईन गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहे. हा स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या जवळपास गोल्ड ईटीएफ खरेदी करता येते. गोल्ड ईटीएफचे बेंचमार्क स्पॉट भाव आहे. पण यासाठी ग्राहकाकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी करु शकता.

डिजिटल सोने

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि एप्स डिजिटल सोने खरेदीसाठी मदत करतात. सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची असेल तर डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. ग्राहक यामध्ये केव्हाही खरेदी-विक्री करु शकतो.  गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या एप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड फंड हा एकप्रकारचा म्युच्युअल फंडच असतो. यामध्ये घरबसल्या तुम्ही फिजिकल गोल्ड न खरेदी करता गुंतवणूक करु शकता. हे गोल्ड फंड, गोल्ड ईटीएफमध्येच गुंतवणूक करतात. याची खरेदी-विक्री सोपी असते. तुम्ही कोणतीही बँक, गुंतवणूक एजंट अथवा म्युच्युअल फंडच्या संकेतस्थळावरुन यामध्ये ऑनलाईन खरेदी करु शकता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.