temperatures, AC Demand : पारा चढल्याने एसी कंपन्यांच्या व्यवसायाने तोडले रेकॉर्ड
उष्णतेच्या लाटेने एसी विक्रीला मोठी चालना मिळाली आहे. एकट्या मार्च महिन्यात 15 लाख एसीची विक्रीचा अंदाज व्यक्त करण्यात करण्यात आला होता.

मुंबई : यंदाच्या उन्हाळ्याने नागरिकांचा घामाटा काढला आहे. भरदुपारी उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. यंदा एप्रिल महिन्यातच पारा विक्रम गाठणार आहे. वायव्य भारतातील बहुतांश भागात उष्णतेची लाट (heatwave)आल्याने आणि देशाच्या अनेक भागांत तापमान (temperatures) 40 अंश सेल्सिअसवर गेल्याने एसीची (ACs) मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. एकट्या मार्च महिन्यात 15 लाख एसीची विक्रीचा अंदाज व्यक्त करण्यात करण्यात आला होता. अजून एक महिना तीव्र उन्हाळा असल्याने एसी विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच एसी विक्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. 2019 मध्ये म्हणजे कोरोना सुरू होण्यापूर्वी देशात 7.5 दशलक्ष एसींची विक्री झाली होती. यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने घर थंडा थंडा कूल ठेवण्यासाठी एसी आणि कूलरचा वापर वाढणार आहे.
एसी उत्पादनाची विक्रमी विक्री
पॅनासोनिक, व्होल्टास, एलजी आणि लॉइड्स सारख्या एसी निर्मात्यांना आशा आहे की, 2022 हे वर्ष उद्योगासाठी बंपर असेल. कोविड टाळेबंदी आणि त्यातील निर्बंधांमुळे दोन वर्षे या उद्योग क्षेत्रासाठी मोठी कठीण गेली. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने यंदा विक्रीत विक्रमी वाढ होऊ शकते. आतापर्यंत दबून राहिलेले मागणी सध्या खूप मजबूत आहे आणि एसी बाजारपेठ, साथरोग पूर्व स्तरावर असलेल्या विक्री पेक्षा जास्त विक्रीची शक्यता आहे. 2019 मध्ये म्हणजे कोरोना सुरू होण्यापूर्वी देशात 7.5 दशलक्ष एसींची विक्री झाली होती, यंदा वातावरण एसी उद्योगासाठी अनुकूल असणे यंदा एसी विक्रीत कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी 9.2- 9.5 दशलक्ष एसी विक्री होण्याची शक्यता आहे. पॅनासोनिकच्या भारत आणि दक्षिण आशिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याविषयीची माहिती दिली. जरी पुरवठ्यातील अडचण असली तरी आम्ही या वर्षी एक विक्रम तयार करण्याची अपेक्षा करतो, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
एप्रिल महिन्यात मागणी वाढतेय
देशात सध्या एसीची आवश्यकता आणि गरज कमी आहे, अंदाजे 6% च्या आसपास आहे. या क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढीसाठी, छोटी शहरे आणि मोठ्या शहरांमध्ये नियमित वीज पुरवठा झाल्यास या क्षेत्रात मागणीत वाढ होऊ शकत नाही. तीव्र उष्णता आणि हवामानाच्या नमुन्यांमधील बदल हे एसीच्या मागणीस मदत करणारे इतर घटक आहेत. देशातील सर्वात मोठ्या एसी निर्मात्यांपैकी एक असलेले व्होल्टासचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्षी यांच्या दाव्यानुसार, सध्या मागणी मजबूत आहे. यावर्षी उन्हाळा तीव्र आहे, मार्च महिना विक्री साठी चांगला असून एप्रिल महिन्यात विक्रीतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
विक्रीचे आकडे वाढले
एलजी इंडियाचे होम अप्लायन्सेस आणि एसीचे प्रमुख दीपक बन्सल यांनी सांगितले की, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये मागणी जोरदार आहे. तर लॉइड ब्रँड चालवणाऱ्या हॅवेल्सचे अध्यक्ष रवींद झुत्शी यांनी सांगितले की, कंपनीने मार्च महिन्यात विक्रमी 2.5 लाख एसीची विक्री केली. विक्रीचे हे आकडे पाहता, येत्या काही महिन्यांत आम्हाला आणखी मजबूत मागणी मिळण्याची आशा असल्याचे झुत्शी यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या