नाद करायचा नाय! सोन्याच्या बाबतीत महासत्ता देशांनाही मागे टाकले; जगातील 11 टक्के सोने भारतीय महिलांकडे

नुकताच जागतिक सुवर्ण परिषदेकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार जागात जेवढे सोने आहे, त्यातील तब्बल 11 टक्के सोने हे भारतीय महिलांकडे असल्याचे म्हटले आहे.

नाद करायचा नाय! सोन्याच्या बाबतीत महासत्ता देशांनाही मागे टाकले; जगातील 11 टक्के सोने भारतीय महिलांकडे
आजचे सोन्याचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 8:35 AM

मुंबई : कोणत्या देशात कीती सोने आहे हे दर्शवणारा एक अहवाल नुकताच जागतिक सुवर्ण परिषदेकडून (World Gold Council) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे जगात सध्या जेवढे सोने उपलब्ध आहे, त्यातील तब्बल अकरा टक्के सोने हे एकट्या भारतातील महिलांकडे (Indian Women) आहे. सोन्याच्या (GOLD) बाबतीत भारतीय महिलांनी अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्ससारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशांनाही मागे टाकले आहे. मात्र दुसरीकडे भारत सोने उत्पादनात खूप मागे असल्याचे या अहवालामधून समोर आले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2027 मध्ये भारताने फक्त एक हजार 594 किलो म्हणजे दीड टन सोन्याचे उत्पादन घेतले आहे. भारत सराफा व्यापाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने इतर देशांकडून आयात करतो.

महिलांनंतर मदिंरात सर्वाधिक सोने

भारतामध्ये महिलांना लक्ष्मीचे रूप माणण्यात येते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे. महिला या लक्ष्मीचे रूप असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण जागतिक सुवर्ण परिषदेकडून जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल अकरा टक्के सोने हे भारतीय महिलांकडे आहे. सोन्याच्या बाबतीच भारतीय महिलांनी मोठ्या-मोठ्या महसत्तांना देखील मागे टाकले आहे. महिलानंतर भारताच्या मंदिरांचा नंबर लागतो. भारतातील विविध मंदिरात जवळपास दोन हजार पाचशे टने सोने असल्याचे या अहवालामधून समोर आले आहे. एकट्या पद्मनाभ स्वामी मंदिरात एक हजार तीनशे टन सोने आहे. तर तिरूपती मंदिरात 250 ते 300 टन सोने असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या देशाकडे किती सोने

जागतिक सुवर्ण परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार चीनकडे 1948 टन इतके सोने आहे. फ्रान्समध्ये 2436 टन, इटलीकडे 2451 टन, जर्मनी 3362 टन, व अमेरिका 8133 टन इतके सोने आहे. मात्र सध्या स्थितीमध्ये भारतीय महिलांकडे तब्बल 21733 टन इतके सोने आहे. सोन्याच्या बाबतीत भारतीय महिलांनी भल्याभल्या देशांना देखील मागे टाकल्याचे हा अहवाल सांगतो. येत्या काळात भारतात सोन्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.