Twitter : ‘कमारिया करे लपालप की..’ या भोजपुरी गीताचा ट्विटरवर धिंगाणा..मस्क यांनी अकाऊंटच केलं की बाद..

Twitter : ट्विटरवरील चक्रमांचा मास्क यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना धडा शिकविण्यासाठी मस्क यांनी धडक मोहिम सुरु केली आहे..

Twitter : 'कमारिया करे लपालप की..' या भोजपुरी गीताचा ट्विटरवर धिंगाणा..मस्क यांनी अकाऊंटच केलं की बाद..
खातेच झाले बादImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 7:43 PM

नवी दिल्ली : ‘कमारिया करे लपालप की लॉलीपॉप लागेलू..’ हे भोजपुरी गीत (Bhojpuri Song) ट्विट करत एलॉन मस्कची (Elon Musk) फिरकी घेणाऱ्या वापरकर्त्याला (Users) चांगलाच धडा मिळाला आहे. केवळ भोजपुरी गीतानेच खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला नाही तर हुबेहुब मस्क यांच्या अकाऊंट (Account) सारखे खाते तयार केले होते. त्यामुळे मस्कचा पार चढला..

या वापरकर्त्याने ‘कमरिया करें लापालप आणि ट्विटर तेरे टुकड़े होंगे’ असे ट्विट (Twit)केले. ते लगेचच व्हायरल झाले. मस्क यांनाच त्याच्याच प्लॅटफॉर्मवर या वाकुल्या काही आवडल्या नाही. त्यातच अकाऊंट मॉडिफाय (Account Modify) केल्याने त्याचा संताप अनावर झाला.

ट्विटरने हे फेक अकाऊंट जाहीर करत ते तात्काळ सस्पेंड (Twitter Account Suspended) केले. पण आज ट्विटरवर आज याचीच चर्चा रंगली. भोजपुरी गीताने आणि फेक अकाऊंटने ट्विटरवर नेटिझन्सने धमाल केली.

हे सुद्धा वाचा

इयान वूलफोर्ड (@iawoolford) नावाच्या युझरने ट्वीट केले. त्यात एक इमोजी पोस्ट केली आणि “ट्विटर तेरे टुकड़े होंगे, गैंग को भी 8 डॉलर देने पड़ेंगे” असं लिहित शुल्क आकारणीचा निषेध केला.

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने कर्मचाऱ्यांच्या कपातीवर निशाणा साधला. त्यानंतर त्याने “कमरिया करें लापालप कि लॉलिपॉप लागेलू” असे लिहित, त्याने दोन हॅशटॅग #8dollar #TwitterLayoffs ही पोस्ट केले.

इयान वूलफोर्ड हा युझर मुळचा ब्रिटेनचा आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियात राहतो. विशेष म्हणजे ते ट्रोब विद्यापीठात हिंदी भाषेचा प्राध्यापक आहे. त्यांच्या या ट्वीटने आज जगभरातील युझर्सचे जोरदार मनोरंजन केले. पण त्याचा त्यांना फटका बसला.

इयान यांना हिंदीसोबतच, मैथिली, भोजपुरी, अंगिका, नेपाळी आणि संस्कृत भाषेचाही अभ्यास आहे. ते या भाषेतही सहजरित्या बोलतात. एका परदेशी प्राध्यापकाने भोजपुरीत केलेले हे ट्वीट मस्क यांना मात्र जिव्हारी लागले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.