Twitter : Elon Musk ने 6 महिन्यांच्या गर्भवतीला काढले कामावरुन, महिला कर्मचाऱ्याने केला निर्धार, म्हणाली, ‘आता भेट कोर्टातच !’

Twitter : मस्कच्या लहरी स्वभावाचा फटका त्यालाच अधिक बसण्याची शक्यता आहे, आता त्याच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु होऊ शकतात.

Twitter : Elon Musk ने 6 महिन्यांच्या गर्भवतीला काढले कामावरुन, महिला कर्मचाऱ्याने केला निर्धार, म्हणाली, 'आता भेट कोर्टातच !'
See you in courtImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 6:33 PM

नवी दिल्ली : एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून त्याच्यावर सातत्याने टीकेचा पाऊस पडत आहे. घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे एलॉन मस्कच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. कर्मचारी कपातीचा (Lay Off) निर्णय मस्कच्या चांगलाच अंगलट येऊ शकतो.

कर्मचारी कपतीचा निर्णय घेतल्याचा फटका ट्विटरमधील एका गर्भवती महिलेलाही बसला. पण ही महिला कर्मचारी शांत बसली नाही. तिने नोकरी गेल्यानंतर ट्विट करत संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर ‘See you in Court!‘, असा इशाराच मस्कला दिला आहे.

शेनन लू (Shennan Lu) असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. डेटा सायंस मॅनेजर असलेल्या लू या सहा महिन्यांच्या गर्भवती आहे. मस्क यांनी सुरु केलेल्या कर्मचारी कपातीचा फटका त्यांना बसला. त्यांनी याप्रकरणी मस्क आणि ट्विटरला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

करारानंतर ट्विटर अधिकृतरित्या मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. पण या करारमध्ये काही चढउतार आले आहेत. परंतु, मस्क आता कोर्टाच्या फेऱ्यात अडकले आहेत. डेलावेअर कोर्टाच्या आदेशानुसार, त्यांना करारातील अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.

कंपनीची सूत्र हाती येताच मस्क यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय राबविला. त्यांनी सर्वात अगोदर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन प्रमुख अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला.

मस्क यांनी कर्मचाऱ्यांवर कपातीचा वरवंटा फिरवला. त्यांनी अर्ध्याच्यावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. सध्या कंपनीत केवळ 3700 कर्मचारी उरले आहेत. या कपातीचा त्सुनामी लाटेत शेनन लू यांची नोकरी ही गेली.

त्यांनी ट्विटरच्याच माध्यमातून संतापाला वाट मोकळी करुन दिली. त्यांनी नोकरीतून बेदल केल्याप्रकरणात मस्क आणि ट्विटरला कोर्टात खेचण्याचा इशारा ट्विट करुनच दिला आहे. त्यांनी मस्क यांना कोर्टात खेचण्याची प्रतिज्ञाच केली आहे.

लू यापूर्वी फेसबूकची मुख्य कंपनी मेटामध्ये (Meta) काम करत होत्या. यावर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी 2022 मध्येच त्या ट्विटरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर, मस्कवर खटला दाखल केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.