AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक व्यवहार करताना या चार तारखा ठेवा लक्षात…दंड भरण्यापासून वाचा! 

आर्थिक नियोजन (financial planning) करताना प्रत्येकाला वर्षातील काही तारखा (Important dates)लक्षात ठेवं गरजेचं असतं. आर्थिक व्यवहारात करताना जर या तारखा चुकल्या तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या तारखा चुकल्या तर नुसता दंड नाही तर तुम्हाला अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं. आज आम्ही तुम्हाला तुमचं आर्थिक कॅलेंडर (Financial calender)सांगणार आहोत.

आर्थिक व्यवहार करताना या चार तारखा ठेवा लक्षात...दंड भरण्यापासून वाचा! 
आयकर रिटर्न
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:31 AM

आर्थिक नियोजन (financial planning) करताना प्रत्येकाला वर्षातील काही तारखा (Important dates)लक्षात ठेवं गरजेचं असतं. आर्थिक व्यवहारात करताना जर या तारखा चुकल्या तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या तारखा चुकल्या तर नुसता दंड नाही तर तुम्हाला अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं. आज आम्ही तुम्हाला तुमचं आर्थिक कॅलेंडर (Financial calender)सांगणार आहोत. आणि या तारखा लक्षात ठेवा आणि आपले आर्थिक व्यवहार सुरळीत करा.

या 4 तारखा कुठल्या

1. टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरणे

2. वार्षिक जीएसटी रिटर्न भरणे

3. आयटीआर, केव्हीसी अपडेट भरणे

4. आधार पॅनशी लिंक करणे तर 15 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 15 मार्च आणि 31 मार्च या तारखा महत्त्वाच्या आहेत.

1. 1 ते 15 फेब्रुवारी

15 जानेवारी ही तारिख टॅक्स ऑडिट रिपोर्टची महत्त्वाची तारीख आहे. कोरोना संकटामुळे ही तारीख वाढून 15 फेब्रुवारी करण्यात आली आहे. तरदुसरीकडे दंडाशिवाय टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत वेळ मागण्यात आला आहे. कारण हा रिपोर्ट भरताना आयटी पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिना आला आहे तर या तारखा विसरू नका.

2. 2 ते 28 फेब्रुवारी

वार्षिक जीएसटी रिटर्न 2020-21 भरण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी आहे. त्यामुळे हे काम लवकर करा. जर ही तारीख चुकली तर तुम्हाला दंड भरावा लागेल. खरं तर 31 डिसेंबरपर्यंत वार्षिक जीएसटी रिटर्न भरायचा होता. मात्र सरकारकडून ही तारीख 2 महिने पुढे ढकलण्यात आली. तर 28 फेब्रुवारीपर्यंत सीबीआयसीनुसार फॉर्म जीएसटीआर-9 आणि फॉर्म जीएसटीआर -9सी हे 2020-21 आर्थिक वर्षासाठी सेल्फ-सर्टिफाइड रिकांसिलेशन स्टेटमेंट तुम्ही दाखल करु शकता.

3. 3 ते 15 मार्च

कॉर्पोरेट क्षेत्रातील करदाते 15 मार्च ही तुमच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे. ऑडिट रिपोर्ट प्रकरणात आयकर रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख आहे. या तारखेला 2021-22 वार्षिक आयकर रिर्टन भरायचं आहे. तर 2020-21 साठी सरकारने रिटर्न भरण्याची तारीख तीन वेळा वाढवली आहे. कंपन्यांसाठी रिटर्न भरण्याची तारीख ही 31 ऑक्टोबर होती.

4. 4 ते 31 मार्च

31 मार्च ही सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे. या तारखेपर्यंत आपल्याला अनेक महत्त्वाचे कामं करुन घ्यायची आहेत. नाही तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपल्या बँक खात्यात केवायसी अपडेट केलं आहे का ते तपासून बघा. यासाठीही सरकारकडून अनेक वेळा तारीख वाढविण्यात आली आहे. तसंच आधार कार्ड पॅनशी लिंक केलं नसेल तर तेही त्वरित करुन घ्या. आज अनेक व्यवहार करताना पॅन आणि आधार लिंक असल्याशिवाय करता येत नाही. ईपीएफ खात्यातही पैसे जमा करण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे 2020-21साठी रिवाइज्ड रिटर्न भरण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे.

संबंधित बातम्या : 

SBI IMPS : 1 फेब्रुवारीपासून तीन नियम बदलणार, तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार, जाणून घ्या

Buy or Rent : घर घेण्याची नेमकी कोणती आहे योग्य वेळ, जेणेकरून भविष्यात टॅक्स वाचू शकतो?

नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.