Gold Silver Rate Today : या आठवड्यात पहिल्यांदा सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी 99.9 टक्के सोन्याचा भाव 438 रुपयांनी वाढून 46,214 रुपये झाला आहे. तर मंगळवारी किंमत 45,776 रुपये प्रति दहा ग्रॅम होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढले आहेत.

Gold Silver Rate Today : या आठवड्यात पहिल्यांदा सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
या आठवड्यात पहिल्यांदा सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 5:35 PM

मुंबई : सोन्याच्या किंमतीत सतत घसरण थांबली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 438 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर या काळात चांदीच्या दरात प्रति किलो 633 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारात खरेदी परतल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. मात्र, ही तेजी टिकाऊ नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीचे दर पुन्हा घसरू शकतात. (For the first time this week, the price of gold increase, know the price of 10 grams of gold)

सोन्याचे नवीन भाव

दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी 99.9 टक्के सोन्याचा भाव 438 रुपयांनी वाढून 46,214 रुपये झाला आहे. तर मंगळवारी किंमत 45,776 रुपये प्रति दहा ग्रॅम होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, किंमत प्रति औंस 1,800 डॉलरपर्यंत वाढली आहे.

नवीन चांदीचे भाव

सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही तेजी पहायला मिळत आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमतीत 633 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीची किंमत 61,507 रुपये प्रति किलो वरून 62,140 रुपये किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती कोणत्याही बदलाशिवाय 23.79 प्रति औंस डॉलरवर स्थिर आहेत.

सोने महाग का झाले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमॅक्सवर सोन्याची खरेदी परतली आहे. यामुळे किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगधंदे वाढल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

भारतात सोने कुठे मिळेल?

भारतातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन कर्नाटक राज्यात (हुट्टी आणि ऊटी खाणींमधून) आणि आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या काही भागांमध्ये (हिराबुद्दीनी आणि केंद्रुकोचा खाणींमधून) होते. सोने सामान्यतः स्वतंत्र किंवा पारा किंवा चांदीच्या मिश्रधातू म्हणून आढळते. बहुतांश सोन्याचे धातू खुल्या खड्ड्यांमधून किंवा भूमिगत खाणींमधून येतात. खडकांमधून धातूच्या स्वरूपात कामगार सोने काढतात.

कार्बन पल्स प्लांटमध्ये खाणीचे दगड आणि त्याच्या पावडरवर प्रक्रिया केली जाते; त्यावर पोटॅशियम सायनाईड टाकून 48 तास ठेवले जाते. सायनाइडसह रासायनिक अभिक्रियेनंतर भंगारात दडलेले सोने द्रव स्वरूपात बाहेर येते. खडकाच्या तुकड्यावर सोने चमकते. सोन्याच्या धातूपासून शुद्ध सोने मिळवण्याच्या सर्व पद्धतींमध्ये, प्रथम खडकांमधून काढलेले धातू धुतले जाते आणि नंतर ते मिलमध्ये पाठवले जाते. मिलमध्ये, धातू पाण्यासह लहान कणांमध्ये ग्राईंड केले जाते. यानंतर, धातूला पाऱ्यासह प्लेट्समधून काढले जाते. (For the first time this week, the price of gold increase, know the price of 10 grams of gold)

इतर बातम्या

अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर

‘तुला भांडणंच लागतात’, पतीचे बोल जिव्हारी, महिलेने रागात स्वत:ची जीभ कापली

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.