Insurance : विमा एकदम मोफत! एक दमडी पण भरु नका, तुमच्याकडे आहे का हा इन्शुरन्स?

Insurance : विमा इंडस्ट्री खूप मोठी आहे. अनेक सरकारी आणि खासगी कंपन्या विम्याचे संरक्षण देतात. पण एक छद्दाम ही न खर्च करता, विमा संरक्षण मिळते. अनेक जणांना याची माहिती नसते. कोणता आहे हा विमा?

Insurance : विमा एकदम मोफत! एक दमडी पण भरु नका, तुमच्याकडे आहे का हा इन्शुरन्स?
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 6:47 PM

नवी दिल्ली : आजकल अनेक लोक विमा पॉलिसी (Insurance Policy) आवर्जून घेतात. कोरोनानंतर विमा इंडस्ट्री फोफावली आहे. आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जीवन विमा हा सुरक्षा कवच देतो. एखादी दुर्घटना घडली तर अशावेळी विमाधारकच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. कोणत्याही लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीचा लाभ तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही त्याचा प्रीमियम (Premium) भरता. पण अशा काही विमा पॉलिसी आहेत, ज्यासाठी तुम्हाला प्रीमियम भरण्याची काहीच आवश्यकता नाही. इन्शुरन्स एकदम फ्री असतो. रोज आपण अनेक सेवांचा वापर करतो. पण त्यावरील मोफत सुविधांची आपल्याला माहिती नसते. विमा इंडस्ट्री खूप मोठी आहे. अनेक सरकारी आणि खासगी कंपन्या विम्याचे संरक्षण देतात. पण एक छद्दाम ही न खर्च करता, विमा संरक्षण मिळते. अनेक जणांना याची माहिती नसते. कोणता आहे हा विमा?

काय मिळते सुविधा दैनंदिन जीवनात आपण अनेक सुविधांचा वापर करतो. अनेक योजनांचा लाभ घेतो. त्यासाठी गुंतवणूक करतो. पण या सेवांवर काय सुविधा मिळतात, याची माहिती आपल्याला नसते. मोफत विम्याची सुविधा पण अशीच आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.

डेबिट कार्ड (Debit Card) डेबिट कार्ड प्रत्येकाकडे असते. यावर मिळणाऱ्या सुविधांविषयी अनेकांना माहिती नसते. डेबिट कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा अगदी मोफत मिळतो. बचत खाते उघडताना बँका तुम्हाला एटीएम कार्ड वा डेबिट कार्ड मिळते. तसेच एखाद्या दुर्घटनेत कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळते.

हे सुद्धा वाचा

गॅस सिलेंडर (Gas cylinder) घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येक घरात असते. गावापासून ते शहरापर्यंत प्रत्येक घरात कुकिंग गॅसची सुविधा असते. परंतु, त्यावर सुद्धा मोफत विम्याचा लाभ मिळतो, हे अनेकांना माहिती नसते. LPG कनेक्शन घेतल्यानंतर वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण त्यावर मिळते. तसेच गॅस सिलेंडर खरेदी केल्यावर विम्याचे संरक्षण मिळते. यामध्ये गॅस सिलेंडरमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.

ईपीएफओ (EPFO) खासगी क्षेत्रातील नोकरदारांना ईपीएफओ इन्शुरन्सविषयी माहिती नसते. ईपीएएफओ सदस्याला 7 लाख रुपयापर्यंत संरक्षण मिळते. EDLI या योजनेतंर्गत पगारदाराला 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. सदस्याचा अचानक मृत्यू ओढावल्यास ईपीएफओकडून त्याच्या वारसदाराला विम्याची रक्कम देण्यात येते. ही रक्कम 7 लाख रुपयांपर्यंत मिळते.

जन धन खाता (Jan Dhan account) पीएम जनधन खाता योजनेतंर्गत खातेदाराला दुर्घटना घडल्यास अथवा इतर सामान्य विमा योजनेतंर्गत लाभ मिळतो. खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30 हजार रुपये साध्या विम्याची सुविधा देण्यात येते. ग्राहकांना विम्यापोटी 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळतो.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.