Jobs : ड्रीम जॉब मिळवा, जगातील मोस्ट ट्रस्टेड ब्रँडने उघडला दरवाजा, पगार ही मिळेल तगडा, 45 हजार जणांचे स्वप्न येणार सत्यात..
Jobs : जगातील अत्यंत विश्वासहार्य ब्रँडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे..
नवी दिल्ली : जगातील अत्यंत विश्वासहार्य ब्रँडमध्ये (Most Trusted Brand) नोकरी करण्याची चांगली संधी तुम्हाला मिळत आहे. नशिबाने दार ठोठावलं आहे. तुम्हालाही हा ड्रीम जॉब (Dream Jobs) मिळू शकतो. तब्बल 45,000 महिला कर्मचाऱ्यांची, कामगारांची या मोठ्या उद्योगात (Big Industry) गरज पडणार आहे. तेव्हा ही संधी सोडू नका..
तर हा मोस्ट ट्रस्टेड ब्रँड अर्थात टाटा उद्योग समूह आहे. टाटाच्या दक्षिण भारतातील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यात जवळपास 45,000 महिला कामगार, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यांना रोजगार देण्याची तयारी कंपनी करत आहे.
कंपनी पुढील 18 ते 24 महिन्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबविणार आहे. दक्षिणेतील ही इलेक्ट्रॉनिक्स कंपनी कोणती आहे, हे तर तुम्हाला कळलंच असेल. टाटाच्या फॅक्टरीतील जगातील सर्वाधिक महागडा फोन आयफोनचे (iPhone) कम्पोनेंट तयार करण्यात येतात.
या कारखान्यात सध्या 10,000 कामगार काम करत आहेत. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या प्लँटमध्ये आईफोनची केसिंग( वरचा भाग) तयार करण्यात येतो. यासह इतरही कामासाठी महिलांना संधी देण्यात येत आहे.
अॅपल कंपनी चीन व्यतिरिक्त जगातील इतर देशातही आयफोनचे उत्पादन करण्यावर भर देत आहे. त्यात टाटा कंपनीने भारतात अॅपलसाठी उत्पादनाचा पर्याय उभा केला आहे. त्यामुळे भारतात हा प्लँट आता विकसीत होत आहे.
तामिळनाडू राज्यात हा प्रकल्प आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात जवळपास 5,000 महिलांना नोकरी मिळाली होती. त्यांना या कामासाठी 16000 रुपये मासिक वेतन देण्यात येत आहे. त्यासोबतच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था ही कंपनीच करत आहे. टाटा त्यांना प्रशिक्षण देण्याच्याही विचारात आहे.
आयफोनचे उत्पादन करणारी विस्ट्रॉन आणि टाटा समूह यांच्यात जॉईंट व्हेंचर तयार करण्यात येणार आहे. भारतात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन कार्प आणि पेगाट्रॉन या कंपन्या आयफोनचे उत्पादन करतात. या प्रकल्पामुळे आयफोनच्या भारतातील किंमती कमी होण्याची शक्यता आहे.