Personal Loan : हो, अगदी स्वस्तात मिळवा कर्ज, रक्कम पण मिळेल जास्त

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेणे म्हणजे अनेक जणांना संकट ओढवण्यासारखे वाटते. कारण त्यावर भरमसाठ व्याज द्यावे लागते. पण या ट्रिकने स्वस्तात कर्ज मिळू शकते.

Personal Loan : हो, अगदी स्वस्तात मिळवा कर्ज, रक्कम पण मिळेल जास्त
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 11:15 AM

नवी दिल्ली : वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेणे म्हणजे अनेक जणांना संकट ओढवण्यासारखे वाटते. कारण त्यावर भरमसाठ व्याज ( Interest Rate) द्यावे लागते. पण अडी-अडचणीला पर्सनल लोनच्या मदतीने अनेक कामे सोपी होतात. पर्सनल लोन अवघ्या काही तासात मिळते. काही वित्तीय संस्थांचे अॅपवर अवघ्या काही मिनिटात वैयक्तिक कर्ज देतात. या कर्जासाठी जादा कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण होते. लग्नकार्य, घराची डागडुजी, क्रेडिट कार्डचे बिल चुकते करणे तसेच वैयक्तिक कामासाठी अनेक जण पर्सनल लोन घेतात.

झटपट कर्ज बाजारात आता वैयक्तिक कर्ज मिळणे फारशे अवघड राहिले नाही. युपीआय अॅपवर तर काही कागदपत्रे दिल्यानंतर लागलीच तुमच्या खात्यात रक्कम ही जमा होते. अथवा अनेक बँका, वित्तीय संस्था ऑनलाईन कर्ज पुरवठा करतात. यामध्येही इन्स्टंट लोन (Instant Loan) हा प्रकार असतो. तो तात्काळ तुम्हाला कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देतो. तुमच्या मागणीनुसार, अटी शर्तीसह एक ठराविक वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यात येते.

व्याजदर का जादा बँका अगदी जुजबी कागदपत्रांवर तुम्हाला कर्ज पुरवतात. म्हणजे केवायसीच्या फार बागुलबुवा न करता, कुठलीही हमी नसताना, हमीदार नसताना बँक कर्ज पुरवठा करते. म्हणजे बँक वैयक्तिक कर्जामध्ये अधिक रिस्क घेत असते. हा बँकेसाठी एक जुगार असतो. कारण सर्वचजण वेळेवर कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका जादा व्याजदर आकारतात.

हे सुद्धा वाचा

ही कागदपत्रे महत्वाची नोकरदार असाल तर वेतनाचा तपशील, राहत्या ठिकाणाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, फोटो आदी दस्ताऐवज पर्सनल लोन घेण्यासाठी लागतात. सलग एक वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे नोकरी करणाऱ्यांना वैयक्तिक कर्ज मिळते. त्यासाठी क्रेडिट स्कोअर तपासले जाते.

लगेच कर्ज कसे मिळेल कर्जदाराची क्षमता जोखून बँका वैयक्तिक कर्ज देतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळणे अधिक सोपे होते. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी कर्जाचे हप्ते कधीही चुकवू नका. नाहीतर पुढील कर्ज घेताना त्याचा फटका सहन करावा लागतो.

क्रेडिट स्कोर ठेवा जोरदार जर क्रेडिट स्कोर जोरदार असेल तर वैयक्तिक कर्जावरील व्याज कमी असेल. जादा क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँका व्याजदर कमी आकारतात. तसेच त्यांना जादा कर्ज मिळू शकते. क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड बिल, कर्जावरील ईएमआय आणि इतर कर्ज वेळेवर चुकते करणे फायदेशीर ठरेल.

सॅलरी अकाऊंटचा वापर तुम्ही नोकरदार असाल तर कर्ज घेताना सॅलरी अकाऊंटचा वापर करणे आवश्यक आहे. तुमची सॅलरी हिस्ट्री पाहून बंका कर्ज देतात. त्यामुळे बँकांना तुमच्यावर विश्वास वाढतो. बँका तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.