टाटा कारवर मिळवा बंपर ऑफर, एक्सचेंजसह साडेआठ लाखांपर्यंतचा भरघोस फायदा…

OEM ग्राहकांना एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट ऑफर आणि कॉर्पोरेट सुटीसोबतच टाटा टियागो, टाटा हॅर्रीअर किंवा सफारीला अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

टाटा कारवर मिळवा बंपर ऑफर, एक्सचेंजसह साडेआठ लाखांपर्यंतचा भरघोस फायदा...
टाटा मोटर्सकडून या महिन्यात काही कार व एसयुव्ही गाड्यांवर काही खास सूट देण्यात आली आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:48 AM

नवी दिल्लीः टाटा मोटर्सकडून (Tata car) या महिन्यात काही कार व एसयुव्ही गाड्यांवर काही खास सूट देण्यात आली आहे. OEM ग्राहकांना एक्सचेंज (exchange) बोनस, कॅश डिस्काउंट ऑफर आणि कॉर्पोरेट सुटीसोबतच टाटा टियागो, टाटा हॅर्रीअर किंवा सफारीला अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ही ऑफर 2021 आणि 2022 मॉडेल लाइनअप अशा दोघांवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, टाटा नेक्सोन इव्ही, टाटा टिगोर इव्ही (Tata Tigor EV) आणि टाटा पंच यांवर कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. टाटा हॅर्रीअरच्या सर्व व्हेरिएंटसाठी 40 हजार एक्सचेंज बोनससह 65 हजारपर्यंतची सूट देण्यात आली आहे. एसयुवी 2.0 लीटर टर्बो- डिझेल इंजीनसह उपलब्ध आहे. त्यात एकतर सहा स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड ऑटोमेटीक गियरबॉक्ससह उपलब्ध आहे. याला 170 एचपी इतके पावर आउटपूट देण्यात आली आहे. हे एमजी हेक्टरसह उपलब्ध आहे.

1) टाटा आपल्या सफारी एसयुव्हीच्या सर्वच प्रकारांवर 45 हजारांपर्यंतची भरघेास सुट देत आहे. परंतु दुसरीकडे एसयुव्हीवर कुठलीही कॉर्पोरेट सुट देण्यात आलेली नाही. एसयुव्हीदेखील टाटा हॅर्रीअर सारखी 2.0 लीटर डिझेल इंजीनसह उपलब्ध आहे. या एसयुव्हीमध्ये सिक्स प्लस वन सीटची सुविधा देण्यात आली आहे. टाटाच्या या एसयुव्हीची स्पर्धा महिंद्रा एक्सयुव्ही 700, एमजी हेक्टर प्लस आणि ह्युंडाई अल्कझर आदींशी केली जात आहे.

2) टाटा मोटर्सच्या सेडन प्रकारातील टाटा टिगोरवर 21 हजार 500 रुपयांचा फायदा मिळू शकतो. या मॉडेलच्या एक्सझेड ट्रीम आणि त्यावरील व्हेरिएंटवर कंझ्यूमर प्लानवर अधिकची 10 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. टाटा टिगोरच्या सर्व व्हेरिएंटवर 11 हजार 500 रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येणार आहे. दरम्यान, याच्या सीएनजी व्हेरिएंटवर कुठलीही सुट देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. टाटा टिगोर 1.2 लीटर पेट्रोल इंजीनसह उपलब्ध आहे. ज्यात पाच स्पीड मॅन्युअल किंवा पाच स्पीड एएमटी गियरबॉक्ससह उपलब्ध आहे. यात, 86 एचपीच्या आउटपूट मिळतो. टिगोरची स्पर्धा मारुती सुझुकी डिझायर, होंडा अमेझसोबत करण्यात येत आहे.

3) टाटा टियागो हॅचबॅकच्या सर्व व्हेरिएंटवर 11 हजार 500 पर्यंत कॉर्पोरेट सुटसोबतच 31 हजार 500 रुपयांपर्यंत फायदा होउ शकतो. याच्या सीएनजी व्हेरिएंटवर कुठलीही सुट देण्यात आलेली नाही. टाटा टियागोची स्पर्धा ह्युंडाई सेन्ट्रो आणि मारुती सुझुकी वेगन आर सोबत आहे.

4) टाटा नेक्सनसोबत पेट्रोल व्हेरिएंटवर 6 हजार आणि डिझेल व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होउ शकतो. टाटा नेक्सन पेट्रोल व्हेरिएंट 1.2 लीटर टर्बो पे्ट्रोल इंजीनसह उपलब्ध आहे. त्यात 120 एचपी पावर आउटपूर जनरेट करण्याची क्षमता आहे. तसेच डिझेल व्हेरिएंट 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजीनसह असून ते 110 एचपी पावर आउटपूट देते.

5) यासह अल्ट्रोजला कुठलीही कॉर्पोरेट सुट किंवा एक्सचेंज सुविधा उपलब्ध नाहीत. असे असले तरी, एसबीआयच्या काही ग्राहकांना हॅचबॅक व्हेरिएंटवर 3 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळू शकते.

संबंधित बातम्या

नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; पवित्र रमजान पर्वामुळे 3 मे पर्यंत होणार अंमलबजावणी

Petrol Desial Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दर गेल्या चार दिवसांपासून स्थिर; मुंबईत आहे इतका दर; आपल्याही शहरातील दर जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway : थांबलेल्या ट्रकमध्ये मागून घुसली कार, अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.