Income Tax on Gold : गुंतवणूक केली ‘सोन्या’वाणी, इतके उचलावे लागेल कराचे ओझे

Income Tax on Gold : सध्या सोन्यामध्ये गुंतवणूकीचे फॅड आले आहे. सोन्याने गेल्या अकरा वर्षांतच दुप्पट परतावा दिल्याने अनेक जण सोन्याकडे वळले आहे. पण सोन्यावर कर द्यावा लागतो का? आयटीआर भरताना माहिती द्यावी लागते का?

Income Tax on Gold : गुंतवणूक केली 'सोन्या'वाणी, इतके उचलावे लागेल कराचे ओझे
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 2:49 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) हा चांगला पर्याय मानण्यात येतो. भारतात विविध सण, समारंभ, लग्नकार्य, कार्यक्रम, महोत्सवात दागिने घालून मिरवण्याचा प्रघात आहे. सोन्याने गेल्या अकरा वर्षांतच दुप्पट परतावा दिल्याने अनेक जण सोन्याकडे वळले आहे. भारतीय केवळ सोन्याच्या दागिन्यातच नाही तर ईटीएफ, सुवर्ण रोख्यात (Gold Bond) गुंतवणूक करतात. बाजारातील अस्थिरतेपासून वाचण्यासाठी सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येते. बाजारातील तज्ज्ञ सोन्याचा पोर्टफोलिओ 10 ते 15 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा सल्ला देतात. सोन्यातील गुंतवणुकीवर किती आयकर द्यावा लागतो माहिती आहे का? आयटीआर फाईल (ITR File) करताना या गुंतवणुकीचा कसा फायदा उठवता येतो?

दीर्घकालीन गुंतवणुकीवर कर

सोन्यातील गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. सॉव्हरिन गोल्ड बाँड, सोन्याचे दागिने, गोल्ड बार्स, गोल्ड ईटीएफ अशा प्रकारात गुंतवणूक होते. गुंतवणूक करताना कर द्यावा लागत नाही. पण सोने विक्री करायचे असेल, त्यातून नफा कमवायचा असेल तर दीर्घकालीन गुंतवणुकीवर कर द्यावा लागतो. याविषयाचा नियम काय आहे?

हे सुद्धा वाचा

असा द्यावा लागतो कर

फिजिकल गोल्डमध्ये सोन्याचे दागिने, आभुषण, शिक्के 36 महिन्यांपेक्षा अधिक काळ जवळ बाळगल्यास कर द्यावा लागू शकतो. लाँग टर्म कॅपिटल एसेट वर्गात ही गुंतवणूक येते. गोल्ड सेव्हिंग फंड वा गोल्ड ईटीएफमध्ये 31 मार्च 2023 रोजी पूर्वी केलेली खरेदी याच वर्गात येते.

फायद्यावर कर

36 महिन्यांनी ही गुंतवणूक करपात्र ठरते. त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असे म्हणतात. विक्री नंतर झालेल्या नफ्यावर 20 टक्के कर द्यावा लागतो. पण तुम्ही 36 महिन्यांपूर्वीच सोने मोडल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन द्यावा लागतो. गोल्ड ईटीएफ वा गोल्ड सेव्हिंग फंडात 31 मार्च 2023 नंतर गुंतवणूक केल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन द्यावा लागतो.

सॉव्हरिन गोल्ड बाँड तर करमुक्त

सॉव्हरिन गोल्ड बाँडवर कुठलाही कर द्यावा लागत नाही. ही गुंतवणूक पूर्णपणे टॅक्स फ्री असते. उलट त्यावर वार्षिक व्याज मिळते. या गुंतवणुकीवर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज मिळते. तुमच्या बँक खात्यात ही रक्कम दर सहा महिन्यांनी जमा होते. सॉव्हरिन गोल्ड बाँडवरील व्याज पूर्णपणे कराच्या परिघात येते. गोल्ड बाँडमध्ये आठ वर्षानंतर कपात करण्यात येते. सोन्यातील गुंतवणुकीच्या व्यवहाराची नोंद आयटीआरच्या अर्जामध्ये ‘इनकम फ्रॉम अदर सोर्स’ या पर्यायामध्ये करावी लागते.  याविषयीची माहिती लपविल्यास त्याचे तोटे पण सहन करावे लागतात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.