AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price | सोने आणि चांदी स्वस्त, परदेशी बाजारातील संकेतांचा परिणाम

Gold Price | सोन्याच्या किंमतीत अर्धा टक्का घसरण झाली आहे. तर चांदीत 1.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. इतर धातुंमध्ये प्लॅटिनियम आणि पॅलेडियम यांच्या किंमतीत एक एक टक्यांची घसरण झाली आहे.

Gold Price | सोने आणि चांदी स्वस्त, परदेशी बाजारातील संकेतांचा परिणाम
सोने-चांदी स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 07, 2022 | 2:55 PM
Share

Gold Price | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) आज घसरण दिसून आली आहे. परदेशी बाजाराच्या(International Market) संकेतांमुळे हा परिणाम दिसून आला. अमेरिकन डॉलर (US Dollar) आणि तिजोरीतील उत्पन्न वाढीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला. गुंतवणुकीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात (Interest Rate) वाढ करण्याची दाट शक्यता आहे. बँकेने यापूर्वी केलेल्या उपायांनी फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे महागाई थांबवण्यासाठी बँक आता पुन्हा व्याजदर वाढवणार आहे.

सोन्या चांदीचे भाव

सोन्या चांदीच्या भावात आज जवळपास अर्धा टक्का घसरण झाली. सोने 1693 डॉलर प्रति औसवर बंद झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, सोन्याला 1685 डॉलरपर्यंत पाठिंबा मिळत आहे. पण या किंमतीवरही सोने थांबले नाही तर ते 1666 ते 1673 डॉलर प्रति औसवर घसरेल.

मागणीत घट

सोन्याची मागणी घटल्यानेही किंमतीत घसरण झाली आहे. एसपीडीआर गोल्ड ट्रस्टनुसार, मंगळवारी सोन्याची मागणी 973 टनाहून घटून 971 टन झाली आहे. हा ट्रस्ट जगातील सर्वात मोठा ईटीएफ आहे.

चांदीचे भाव घसरले

तर चांदीत 1.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. इतर धातुंमध्ये प्लॅटिनियम आणि पॅलेडियम यांच्या किंमतीत एक एक टक्यांची घसरण झाली आहे.

देशातील बाजारावरील परिणाम

परदेशी बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली तर त्याचा थेट परिणाम देशातंर्गत बाजारावर दिसून येईल. या महिन्यापासून सणाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणाचा मोठा राबता राहणार आहे. मागणी वाढेल.

सोन्याच्या किंमती वाढूही शकता

मागणीत वाढ झाली तरी एका ठराविक पातळीपेक्षा देशातंर्गत सोन्याच्या किंमतीत घसरण होणार नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.