Gold Price: जुलैमध्ये सोनं 1132 रुपयांनी महागलं, चांदी 2380 रुपयांनी स्वस्त, आता ऑगस्टमध्ये काय घडणार?

Gold Rate | 1 जुलै 2021 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर 46,310 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर चांदीचा प्रतिकिलो दर 68,654 रुपये इतका होता

Gold Price: जुलैमध्ये सोनं 1132 रुपयांनी महागलं, चांदी 2380 रुपयांनी स्वस्त, आता ऑगस्टमध्ये काय घडणार?
सोन्याचा दर
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 10:15 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. आतादेखील सोन्याचा दर साधारण 47 हजार रुपये प्रतितोळ्याच्या आसपास आहे. मात्र, आगामी काळात सोने पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

1 जुलै 2021 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर 46,310 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर चांदीचा प्रतिकिलो दर 68,654 रुपये इतका होता. जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत 1132 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीचा दर 2380 रुपयांनी घसरुन 66,274 च्या स्तरापर्यंत आला. त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर

महागाई वाढल्यामुळे आणखी काही काळ सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळतील. मात्र, ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढायला सुरु होतील. लवकरच सोने 48500 रुपयांचा टप्पा ओलांडेल. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आत्ता उत्तम संधी आहे. तर डिसेंबर महिन्यात सोन्याचा दर 60 हजारापर्यंतही ही जाऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सोन्याचा रोजचा दर कसा जाणून घ्याल?

तुम्ही घरबसल्याही सोन्याचा रोजचा दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर सोन्याचा दर तुम्हाला कळू शकतो.

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.